आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोरोनामुळे आई-वडील मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क माफी; क्रीडा शुल्कासह विविध शुल्कही होणार माफ, विद्यापीठाचा निर्णय

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कोविड‘मुळे आई-वडीलांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे संपुर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. तसेच ‘कोविड‘च्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची शुल्क माफी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. अशी माहिती शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव आय.आर.मंझा यांनी दिली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची जुलै अखेरीस बैठक होऊन महत्वपूर्ण ठराव घेण्यात आला होता. या सदंर्भात विद्यापीठाने उस्मानाबाद उपपरिसर तसेच औरंगाबादसह, बीड, जालना, जिल्हयातील संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना शैक्षणिक विभागाच्यावतीने बुधवारी परिपत्रक पाठविण्यात आले आहे.

सदर परिपत्रकात म्हटले आहे की, ‘कोविड-१९‘ पार्श्वभूमीवर पालकांची आर्थिक परिस्थिती व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाचे पत्र ३० जून आणि व्यवस्थापन परिषदेने दि.३० जुलै रोजी विद्यार्थ्यांना विविध शुल्कांमध्ये सवलत देण्याबाबत घेतलेल्या निर्णयानूसार शुल्क माफी आणि भरणा करणेबाबत सवलत देण्यात येत आहे.

यावेळी घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय

ज्यात विद्यार्थ्यांचे आई/वडिल/पालक कोविड-१९ च्या प्रादर्भावामुळे मृत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे/ पदवी/ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्यात येईल. तसेच अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन / उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टीवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेला नाही. त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे, प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५०% टक्के सवलत देण्यात यावी, विद्यार्थ्यांद्वारे वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात यावे, विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांत देखील इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन / उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टीवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात यावे. त्याप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५०% टक्के सवलत देण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात यावी, शुल्क थकीत असले तर परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची संलग्नित महाविद्यालयांमार्फत दक्षता घेण्यात यावी. असेही पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...