आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:आजपासून विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सुरुवात ; 22 नाेव्हेंबरपासून सुरुवात हाेणार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेला २२ नाेव्हेंबरपासून सुरुवात हाेणार आहे. यात परीक्षा विभागाच्या वतीने पदवीच्या प्रथम सत्र परीक्षा घेण्यात येईल. यादरम्यान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देणार आहेत. यासाठी विद्यापीठांतर्गत ३ लाख १२ हजार २०९ परीक्षार्थींची संख्या आहे. यासाठी २४४ परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. या परीक्षेसाठी महिनाभरापूर्वीच सर्व परीक्षा केंद्रांच्या बैठक क्षमतेची चाचपणी केली हाेती. परीक्षार्थींचा वर्णमालेनुसार बैठक क्रमांक राहील.

१०० अर्ज फेटाळले : अनेक महाविद्यालयांनी सुरुवातीला परीक्षा केंद्र स्वीकारले. परीक्षा मंडळाने या केंद्रांची तपासणी करून केंद्रांच्या यादीत संबंधित परीक्षा केंद्रे समाविष्ट केली. परंतु, पुन्हा अनेक महाविद्यालयांनी शेवटचे १५ दिवस बाकी असताना केंद्र रद्द करून दुसरे केंद्र द्यावे, यासाठी १०० कॉलेजांनी संचालकांकडे अर्ज केले होते. परंतु, हे सर्व अर्ज फेटाळले असून पूर्वीचे केंद्र कायम ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...