आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन नवीन स्टार्टअप उद्योग सुरू करणाऱ्यांना आता चांगले दिवस आहेत. केंद्र, राज्य सरकारसह कंपन्या आणि बँका आर्थिक सहकार्य देण्यास तयार आहेत. युवकांनी त्याचा लाभ घ्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंक्युबिशन सेंटरमार्फत आत्तापर्यंत ४३ स्टार्टअपला आर्थिक मदत दिल्याची माहिती बजाज इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’अटल इन्क्युबेशन सेंटर-बामू फाऊंडेशन’च्या वतीने ’स्ट्रेन्थनिंग ऑफ स्टार्टअप इकोसिस्टीम अॅण्ड बिझनेस मॉडेलिंग’ या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सीबाचे सीईओ प्रसाद मेनन, सिम्बायोसिसचे अविनाश ठाकूर, योगेश ब्राह्मणकर, मंगेश श्रीवास्तव, सुमित श्रीवास्तव, ‘सेंटर’चे सीईओ’ अमित रंजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘स्टार्टअप इकोसिस्टिम बळकटीकरण आणि बिझनेस मॉडेलिंग’ या विषयावर सिफार्ट सभागृहात कार्यशाळा पार पडली.
डॉ. देशमुख म्हणाले, ‘कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंच्या प्रयत्नामुळे नीती आयोग व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे अनुदान केंद्राला प्राप्त झाले आहे. आत्तापर्यंत ४३ स्टार्टअपना केंद्राच्या वतीने आर्थिक सहकार्य केले आहे. नावीन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना मूर्त स्वरूप देऊन उद्योजकता वाढीस चालना देण्यासाठी अटल इन्कुबेशन सेंटरची स्थापना केली आहे. प्रसाद मेनन, अविनाश ठाकूर, मनीष श्रीवास्तव, सुमित श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले.
अडीचशे प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग कार्यशाळेत २५० प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. नवीन खंडारे यांनी प्रास्ताविक केले. सुजाता मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. ऑफिस स्पेस, मेंटरिंग सहकार्य, मार्केटिंग, कायदेशीर, नेटवर्किंग, आय.पी, उद्योगाचा प्रकल्प अहवाल तयार करणे, निधी-भांडवल उभारणीसाठी प्रभावी सादरीकरण कसे करायचे यावर प्रशिक्षण दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.