आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेट अधिसभा निवडणूक:दुसऱ्या टप्प्यासाठी 17 केंद्रांवर शनिवारी मतदान, 70 उमेदवार रिंगणात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व विद्या परिषद निवडणूकीची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. 4 हजार 205 मतदार 4 जिल्ह्यातील 17 मतदान केंद्रावर शनिवारी (10 डिसेंबर) मतदानाचा हक्क बजावतील. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली आहे.

विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद, अभ्यास मंडळ निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर गटातील दहा जागांसाठी झाली. त्याची मतमोजणीही झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील अधिसभेच्या 29, विद्या परिषदेच्या 8 तर 38 अभ्यासमंडळाची निवणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. सर्व जागांसाठी सकाळी 8 ते 5 दरम्यान मतदान होईल. बीड, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हयात प्रत्येकी पाच तर जालना जिल्हयात दोन मतदान केंद्रे आहेत. औरंगाबादेत नाटयशास्त्र विभागात दोन बूथ असतील.

यशंवतराव चव्हाण महाविद्यालय (सिल्लोड), शिवाजी महाविद्यालय (कन्नड), विनायकराव पाटील महाविद्यालय (वैजापूर) व प्रतिष्ठान महाविद्यालयात (पैठण) प्रत्येकी एक केंद्र असेल. बीड येथे केएसके महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (अंबाजोगाई), भगवान महाविद्यालय (आष्टी), सिध्देश्वर महाविद्यालय (माजलगांव), बाबुराव आडसकर महाविद्यालयला (केज) प्रत्येकी एक केंद्र असेल.

उस्मानाबादेतील विद्यापीठाचे उपकेंद्र, तुळजाभवानी महाविद्यालय (तुळजापूर), ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय (कळंब), आदर्श महाविद्यालय (उमरगा), रा.गो.शिंदे महाविद्यालय (परांडा) येथेही केंद्र असतील. जालनामध्ये जेईएस महाविद्यालय (जालना), मॉडेलकॉलेज (घनसांवगी) अशा 17 केंद्रांचा समावेश आहे.

  • मतदार संघ, उमेदवार आणि मतदार असे
  • निवडणूकीत अधिसभेच्या 25 व विद्यापरिषदेच्या 6 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. दोन्ही गटाततीन जागा बिनविरोध आल्या आहेत. तीन जागा रिक्त राहिल्या आहेत.
  • विद्यापीठ शिक्षक - 3 जागा, 9 उमेदवार, 128 मतदार
  • संस्थाचालक : 4 जागा, 8 उमेदवार, 169 मतदार
  • प्राचार्य : 8 जागा, 14 उमेदवार, 78 मतदार
  • महाविद्यालयीन शिक्षक : 10 जागा, 39 उमेदवार, 2 हजार 587
  • विद्यापरिषदेच्या 6 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत.

या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविदृयालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार आहेत. निवडणूक विभागाचे संजय लांब विशेष परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...