आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कॅम्पस आता शैक्षणिक सहलीसाठी खुला होत आहे. हा परिसर नयनरम्य करण्यासोबतच विद्यापीठातील ऐतिहासिक स्थळांच्या भेटी आणि ‘सायन्स ऑन व्हील’द्वारे विज्ञानाचे प्रयोगही या सहलीत समाविष्ठ असतील. तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी कोट्यवधींची (२०१३) सायन्स ‘व्हॅन’ घेतली होती. त्यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी (२०१४-२०१९) विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त (२३ ऑगस्ट) तीनदिवसीय ‘ओपन डे’ साजरा केला होता. त्या वेळी शहरातील शाळांना निमंत्रित करून ‘सायन्स व्हॅन’मधील प्रयोग दाखवले जात होते.
आता ‘ओपन डे’ साजरा केला जात नाही, परंतु १५ जानेवारीपासून शालेय विद्यार्थ्यांना या सहलीसाठी विद्यापीठात निमंत्रित केले जाईल. त्यासाठी कुलगुरू डॉ. येवले शाळांना पत्र पाठवणार आहेत. प्रवेशद्वारापासून संपूर्ण कॅम्पस दाखवला जाईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे एका महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. वाय पॉइंटवरील बाबासाहेबांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे सेल्फी पॉइंट म्हणून विकसित केले आहेत.
दहा दिवसांनी सुरू होईल चहलपहल आम्ही लवकरच टीम बनवून जबाबदारी देऊ. विद्यार्थी त्यांचे जेवणाचे डबे आणतील. पिण्याचे पाणी, गाइड आम्ही देऊ. कुलगुरूंच्या मंजुरीनंतर शाळांना पत्र दिले जातील. विद्यार्थी भविष्यात येथेच येतात. त्यासाठी या सहली महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतात. - डॉ. भगवान साखळे, कुलसचिव
सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत कारंजे { कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी उद्यान स्वच्छ करून घेतले. तिथे कारंजे बसवण्यात येतील. सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत कारंजे सुरू राहतील. { वनस्पतिशास्त्र विभागाची प्रयोगशाळा असलेल्या उद्यानातील जैवविविधता अनोख्या स्वरूपाची आहे. विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून दिली जाईल. { शेजारच्या इतिहास वस्तुसंग्रहालयातील शिलालेख, प्राचीन व ऐतिहासिक वस्तूंचा खजिना विद्यार्थ्यांना पाहता येईल. येथे शुल्क आकारतात. पण, शालेय विद्यार्थ्यांकडून शुल्क न आकारण्याचा डॉ. साखळे यांचा मानस आहे. { सोनेरी महाल, बुद्धलेणीचे ऐतिहासिक महत्त्व आणि लेण्यांतील तथागत गौतम बुद्धाचे शिल्प, स्तूप विद्यार्थी पाहतील. { डॉ. रमेश चोंढेकर यांच्याकडे सायन्स व्हॅनचे काम सोपवले आहे. तद्वतच सहलींचे समन्वयकही त्यांनाच केले आहे. त्यांच्या टीममध्ये इतिहास, वनस्पती, आर्किऑलॉजी आणि तत्सम विषयांचे पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना गाइड करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.