आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ सिनेट निवडणूक:दुसऱ्या टप्याच्या 29 अधिसभा जागांसाठी अद्याप एकही अर्ज नाही; 19 नोव्हेंबरपर्यंतची मुदत

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्यासाठी अधिसभा व विद्यापरिषद निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. पहिल्या दोन दिवसात एकही नामांकन दाखल झाले नाही. आत्तापर्यंत फक्त दोन अर्जांची विक्री झाली आहे. 19 नोव्हेंबर अर्ज करण्याचा अखेरचा दिवस असून 10 डिसेंबरला मतदान आहे. सर्व गटात 4,430 मतदारांचा समावेश आहे.

अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळ या प्राधिकरणांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या 10 जागांसाठी 26 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिसभेच्या 29 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, महाविद्यायीन प्राध्यापक या गटातून प्रत्येकी दहा अधिसभेच्या जागा आहेत. संस्थाचालकांच्या मतदारसंघातून सहा उमेदवार विजयी होतील. विद्यापीठातील शिक्षक मतदारसंघातून 3 उमेदवार अधिसभेत निवडूण जाणार आहेत. त्याचबरोबर विद्या परिषदेच्या निर्वाचित 8 जागांसाठीही 10 डिसेंबरलाच मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांसाठी नामांकन दाखल करण्यास 11 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली होती.

19 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. 10 डिसेंबरला मतदान होऊन 13 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघांची अंतिम मतदारयादी 9 नोव्हेंबरला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत दोन अर्जांची विक्री झाली पण एकही नामांकन अद्याप दाखल करण्यात आले नाही. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य राहुल जनार्दन म्हस्के यांनी संस्थाचालक व महाविद्यालय शिक्षक या दोन्ही मतदारसंघातून दोन अर्ज घेतल्याची माहिती आहे.

रविवारीही सुरू राहिल निवडणूक विभागाचे काम

दरम्यान रविवारी सुटी असली तरीही निवडणूक विभागाचे कार्यालय सुरूच राहणार आहे. इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील. अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे यांनी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 4 हजार 430 मतदार आहेत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे 50 अपिलांवर सुनावणी झाली होती. त्यानंतर यादी अंतिम केली आहे.

बातम्या आणखी आहेत...