आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:विद्यापीठाने महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसारच परीक्षा घ्याव्यात : आ. सतीश चव्हाण

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेताना महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता लक्षात घेऊन प्रवेश क्षमतेनुसारच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पत्राद्वारे केली. विद्यापीठाच्या वतीने सध्या पदवीच्या परीक्षा सुरू असून काही दिवसांपूर्वी परीक्षा विभागाने परीक्षा केंद्राच्या बैठक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिसंख्या दिल्याने शहरातील काही महाविद्यालयात एका बेंचवर तीन विद्यार्थी बसवल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यासंदर्भात आ. चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. येवले यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, विद्यापीठाअंतर्गत काही महाविद्यालयांत पायाभूत, शैक्षणिक सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून अनेक महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर हा गोंधळ दिसून आला. त्यामुळे विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयांत प्रवेश क्षमतेनुसारच प्रवेश द्यावे व प्रवेश क्षमतेनुसारच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...