आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वप्रथम गोल सेट करा, मग कठोर परिश्रमाने लक्ष भेदा:क्रीडा महोत्सवाच्या समारोपात ऑलम्पिकपटू सुमंगला शर्मा यांचा सल्ला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा गुण असलेल्या खेळाडूंनी सर्वप्रथम गोल सेट केले पाहिजे. त्यानंतर लक्ष भेदण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे, असे मत ऑलंपिकपटु सुमंगला शर्मा यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षिस वितरण बुधवारी (७ डिसेंबर) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते.

त्या म्हणाल्या, ‘कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल ध्येय निश्चित करता आले पाहिजे. पूर्वी आमच्या वेळी तर अधुनिक तंत्रज्ञान नव्हते. आता सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळाडूंनी अखंड प्रयत्नांची जोड द्यावी. क्रीडा स्पर्धांच्या राज्य सरकारच्या दुत नवेली देशमुख म्हणाल्या, आपल्यातील ऊर्जा योग्य दिशेने नेली पाहिजे. तरुणांचा देश म्हणून भारताची जगभर ओळख आहे.

स्वत: सह देशाचे नाव मोठे करता आले पाहिजे. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, राजभवन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक. माने, सदस्य डॉ. दिनेश पाटील, डॉ. मोहन अमरुळे, निकाल समितीचे शरद बनसोड, विठ्ठलसिंह परिहार, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, संयोजन समिती सदस्य डॉ. उदय डोंगरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. कल्पना झरीकर, संयोजन समिती सदस्य डॉ. फुलचंद्र सलामपुरे यांची यावेळी उपस्थिती आहे. डॉ. संदीप जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पुरुषोत्तम देशमुख व अमृत बिऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दयानंद कांबळे यांनी आभार मानले.

आम्ही मॅट विकत घेऊ- कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

पुढील काळात होणाऱ्या सर्व प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धा या मॅटवर घेण्यात येतील. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येतील. त्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. ‘मॅट’ विद्यापीठ विकत घेणार असल्याची घोषणा कुलगुरूंनी केली. निकालात संपूर्ण पारदर्शकता होती. स्पर्धेतील चषक कदाचित जुनी होतील मात्र आठवणी नेहमीच ताज्या असतात. प्रेरणाही देत राहतील.

बातम्या आणखी आहेत...