आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय सेवा योजना:साहसी क्रीडा स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ रवाना ; चिखलदरा येथे आयाेजित करण्यात आली आहे स्पर्धा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात यंदा साहसी क्रीडा स्पर्धा २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचा संघ रवाना झाला आहे. नवजीवन सोसायटी, सूर्यकांत जोग दीपशिखा गुरुकुल, सैनिकी स्कूल यांच्या सौजन्याने चिखलदरा येथे ही स्पर्धा आयाेजित केली आहे.

चार जिल्ह्यांतून ७ स्वयंसेवक आणि १ संघप्रमुख अशा ८ जणांचा संघात समावेश आहे. पटेल नाझीम युनूस, आदित्य वाघमारे, कृष्णा राठोड, अभिषेक ठाकुर, अंकुश दामबले, दीक्षा सपकाळ, सोनाली लाबडे आणि संघप्रमुख डॉ. एम.डी. आचार्य यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...