आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांच्या बृहत आराखड्यासाठी लिंक जारी:नव्या कॉलेजांसाठी विद्यापीठ करणार ऑनलाइन सर्वेक्षण

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुढील पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी यंदा नवी शक्कल काढली आहे. थर्स्टी एरिया अर्थात गरजेच्या ठिकाणीच कॉलेज दिले जावे म्हणून नागरिकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी http://online.bamu.ac.in/unic/perspective_plan_survey.php ही लिंक उपलब्ध करून दिली असून त्यावरूनच ऑनलाइन सर्वेक्षण केले जाणार आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१ मार्च) संवैधानिक अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. बृहत आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बृहत आराखडा तयार करताना पुर्वी एकाच वर्षीचा विचार केला जात होता. या वेळी मात्र आगामी पाच वर्षांचा एकत्रित आराखडा तयार केला जाणार आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील नागरिक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थ्यांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण : राज्य शासनानेच १६ जानेवारी २०२३ रोजी तसा शासन निर्णय जारी केला आहे. नागरिकांच्या सूचनांमधूनच २०२४-२०२९ दरम्यानचा बृहत आराखडा तयार करण्यात येईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षण आवश्यक आहे. सध्या कार्यरत महाविद्यालय आणि संस्थेत चालू असलेले अभ्यासक्रम, नवीन महाविद्यालयांबाबत आपल्या भागात कोणत्या अभ्यासक्रमांची नवे महाविद्यालयांची आवश्यकता आहे, याचे हे सर्वेक्षण होईल. वरील लिंकवर प्रश्नावली आहे. त्यात सूचना, माहिती द्यावी,’ असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...