आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फैलाव:ओमायक्रॉनच्या विपरीत जगात कुठे कमी तर कुठे जास्त फैलाव

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील कोरोना संसर्गात घट होताना दिसत नाही. संख्यावाढीमागे मायक्राॅनचे सर्व सबव्हेरिएंट कारणीभूत ठरले आहेत. त्यातही बीए-४ व बीए-५ मुळे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ताे इम्युनिटीला चकवा देत आहे. आता तर दिल्लीपर्यंत हा विषाणू पाेहोचला आहे. बीए-४ व बीए-५ किती धोकादायक आहेत हे जाणून घेऊ.

-बीए-४, बीए-५ काय आहेत?
हे सबव्हेरिएंट बीए-१ पेक्षा बीए-२ शी जास्त मिळतेजुळते आहेत. याच विषाणूंचा गेल्या वर्षी मायक्राॅनच्या जागी फैलाव झाला होता. परंतु बीए-४ व बीए-५ चे म्युटेशन अनाेख्या पद्धतीने होते. हे स्पाइक प्रोटीनमध्ये बदल घडवून शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला भेदू शकताे. बीए-४ व बीए-५ हे आधीच्या मायक्राॅनचे सबव्हेरिएंट मानले गेले आहेत. परंतु न्यू मेक्सिकोमध्ये अप्रकाशित विश्लेषणानुसार त्याचा उगम बीए-२ मधून झाला असावा.

-किती धोकादायक आहेत हे सबव्हेरिएंट्स?
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार बीए-४ व बीए-५ या सबव्हेरिएंटचा बीए-२ व बीए-१ मधून उगम झाला आहे. बीए-४ व बीए-५ मायक्राॅनमधून आलेल्या रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्यास सक्षम आहेत. म्हणजे मायक्राॅॅनपूर्वी बाधित झालेले लाेक आता पुन्हा बाधित होऊ शकतात. म्युटेशनमुळे संसर्ग १० ते १५ पटीने वाढला आहे.

-सबव्हेरिएंटचा फैलावास कधी सुरुवात झाली?
दक्षिण आफ्रिकेत याच जानेवारीत बीए-२ सबव्हेरिएंटच्या फैलावास सुरुवात झाली होती. बीए-४ व बीए-५ ने मायक्राॅनचे मूळ स्ट्रेनला रिप्लेस केले होते. अमेरिका व युरोपातही इतर सबव्हेरिएंट्सच्या तुलनेत या सबव्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत आहे. युरोप व अमेरिकेने त्यास व्हेरिएंट्स आॅफ कन्सर्न असे घाेषित केले आहे.

-जागतिक पातळीवर हे का वाढत आहेत?
व्हेरिएंट्सच्या फैलावामागील कारण त्यात जैविक परिवर्तन असू शकते. बर्न विद्यापीठातील महामारी तज्ज्ञ ख्रिश्चन अल्थाॅस म्हणाले, सबव्हेरिएंटच्या वेगाने वाढीमागे स्टेम आहे. म्हणूनच मायक्राॅनने बाधित लाेकांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकताे.स्वित्झर्लंडमध्ये मायक्रॉन कमी घातक राहिला. तेथे बीए-५ चा जास्त संसर्ग झाला. तेथे बहुसंख्य लोकांचे लसीकरण झाले आहे. अशाच प्रकारे मायक्रॉन दक्षिण आफ्रिकेत जास्त फैलाव झाला होता. बीए-४, बीए-५ ने कमी लोकांमध्ये संसर्ग झाला.

-बचावासाठी लस किती प्रभावी?
डेटानुसार सब व्हेरिएंट्समुळे संसर्ग झाल्यामुळे गंभीर आजार होत नाही. त्याशिवाय रुग्णालयात दाखल होण्याचीही गरज नाही. परंतु लसीचा प्रभाव जाणवत नाही.
-