आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवकाळी पावसाने यंदा ठराविक अंतराने हजेरी लावल्यामुळे अांब्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगदी माेहर लागल्यापासून ते फळधारणा झाल्यावरही अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला. त्यामुळे ग्रामीण भागातील गावरान अांब्याचा मेवा यंदा चाखता येणार नाही.
टाकळी जिवरग परिसरात अवकाळी च्या तडाख्याने गावरान आंबा पूर्णत: गळून पडला. यामुळे मे महिन्यात बाजारपेठेत येणारा गावरान अांब्याचा घमघमाट दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना इतर राज्यातील अांब्याची चव चाखावी लागणार अाहे.
बाजारात कोकण, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मधून आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला अाहे. त्यात मध्य प्रदेशातून आलेला लालबाग, बैगनपल्ली आंबा जास्त आहे. या आंब्याचे दर ५० रुपये किलोच्या घरात भाव आहेत. केशर आणि इतर आंब्याचे दर १०० ते १२० रुपये किलो आहेत. हापूस आंब्याचे दर यंदा ७०० ते २००० रुपये पेटी पर्यंत आहेत.
मे महिन्यात गावरान आंबा बाजारात विकायला येतो. लाडू, खोबऱ्या, घोटी, शेवळ्या, लाल्या अशा नानाविध जाती अाहेत. प्रत्येक गावात वेगळ्या नावाने गावरान अांबा विकला जातो. हापूस आंब्यापेक्षाही त्याची वेगळी चव असते; मात्र गावरान अांब्याचे जतन झालेले नाही.
आंबा परिपक्व होऊन पिकण्याच्या अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे अांब्याचे नुकसान झाले. त्यामुळे झाडाला एकही आंबाही शिल्लक नाही. यामुळे यंदा गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार नाही अशी स्थिती अाहे. एक पाऊस आल्यानंतर लोणच्याचा गावरान आंबा उतरवला जातो; मात्र अवकाळी पाऊस आणि वादळाने फळ शिल्लकच राहिले नाही.
यामुळे लोणच्यासाठी यंदा परीपक्व कैरी मिळणार नाही अशी स्थिती आहे. रसाळीच्या अांब्यासाेबत लाेणच्यासाठीही यंदा परराज्यातील कैरीवर अवलंबून राहावे लागणार अाहे. परराज्यातील अांब्यावर रसाळी अवलंबून गावखेड्यातील शेतशिवारात शेत तेथे गावरान आंबा दिसतो. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने असंख्य आंब्याची झाडे दिसतात.
उन्हाळ्यात गाव खेड्यात गेल्यावर रसाळी म्हणजे रसाचा बेत असलेले जेवण हमखास मिळते; मात्र या आंब्याच्या झाडांवर कुऱ्हाड चालली. शिल्लक असलेल्या अांब्याचे अवकाळीने नुकसान झाले. त्यामुळे परराज्यातील आंब्यावरच रसाळींचा पाहुणचार करावा लागणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.