आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:कुंभेफळच्या जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडाली

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन खोल्या पडल्यामुळे शाळेतील संगणक व वाचनालयाच्या साहित्याचे नुकसान झाले.

रविवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कुंभेफळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा सन 1949 साली बांधलेल्या दोन पत्र्याच्या खोलीचे पत्रे उडाले व भिंती पडल्या तर काही भिंतीला तडे गेलेले आहे. शाळेत विद्यार्थी नसल्यामुळे जिवीत हानी झाली नाहीत. परंतु दोन खोल्या पडल्यामुळे शाळेतील संगणक व वाचनालयाच्या साहित्याचे नुकसान झाले.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बद्रिनाथ मुळे, ज्ञानेश्वर माऊली शेळके, वसंतराव घाळ, संतोष शेजवळ, ज्ञानेश्वर गोजे, राजूभाऊ जवणे, सपनाताई डाखुरकर, व‍िलास ताठे, मुख्याध्यापक हाशम शहा यांनी उडालेल्या पत्रे जमा करून नुकसानीचा पंचनामा करून हे पत्र जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांना पंचनाम्याचे पत्र सादर केले.

बातम्या आणखी आहेत...