आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठ स्थापना दिन:खंडपीठात तैलचित्रांचे अनावरण ; न्या. संजय गंगापूरवाला यांची प्रमुख उपस्थिती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला. ४१ व्या स्थापना दिनानिमित्त खंडपीठाच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या ३ महत्त्वाच्या व्यक्तींच्या तैलचित्रांचे अनावरण न्यायमूर्तींच्या उपस्थितीत झाले.औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे आणि तत्कालीन कायदामंत्री शिवाजी पा. निलंगेकर यांची तैलचित्रे खंडपीठाच्या १४ क्रमांकाच्या वकिलांच्या कक्षात लावली. खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन चौधरी, सचिव अॅड. सुहास उरगुंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्न वराळे, न्या. संजय गंगापूरवाला, न्या. रवींद्र घुगे, न्या. नितीन सूर्यवंशी, न्या. एस. जी. मेहरे, न्या. आर. जी. अवचट, न्या. एम. जी. शेवलीकर, न्या. राजेश पाटील, न्या. बी. पी. देशपांडे, न्या. संदीप मारणे, न्या. संदीपकुमार मोरे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...