आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 19 फेब्रुवारीलाच अनावरण, कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे जवळपास निश्चित झाले अाहे. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात अाला अाहे. मात्र, अनावरण झाले नाही. ते कधी होणार? याची शहरवासीयांना उत्सुकता अाहे. दुसरीकडे महापालिकेच्या वतीने अनावरणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवजयंतीच्या दिवशी अथवा त्याअाधी राज्य सरकारने तारीख दिल्यास त्याच दिवशी पुतळ्याचे अनावरण केले जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९ फेब्रुवारीलाच अनावरण करण्याचे ठरवल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. मात्र, याबाबत अधिकृत माहिती महापालिकेला देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा संघटना, क्रांती मोर्चा, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवस्मारकाचे अनावरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती. आता मनपाने अनावरण सोहळा जाहीर केला नाही तर एक दिवस अगोदर म्हणजे १८ फेब्रुवारीला सायंकाळी पुतळ्याचे अनावरण करू, अशी भूमिका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...