आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर क्राईम:यूपीच्या 21 वर्षीय भामट्याचा महिलेस 21 लाखांना गंडा, सलग दहा महिने तपासानंतर दिल्लीतून अटक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पतीपासून विभक्त ३७ वर्षीय महिलेची सोशल मीडियावर जर्मनीचा रहिवासी असे सांगणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. पुढे त्याने तिचा विश्वास संपादन केला. मग महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगत स्थानिक-विदेशी कर, विमानतळ शुल्क अशी विविध कारणे सांगून तिच्याकडून २१ लाख ५० हजार रुपये लुटले. तिने डिसेंबर २०२० मध्ये तक्रार केल्यावर औरंगाबाद सायबर पोलिस विभागाने दहा महिने सलग तपास केला. दिल्लीमध्ये चार दिवस मुक्काम ठोकून दोन किलोमीटर पाठलागानंतर ३० ऑक्टोबर रोजी आशिषकुमार भगवानदीप मौर्य (२१, रा. ग्राम ढेवरिया राऊत, भैंसला, हरैया जि. बस्ती उत्तर प्रदेश ह.मु. बी ब्लॉक कॅम्प क्र.४, ज्वालापुरी, नांगालोई, नवी दिल्ली) भामट्याला अटक केली. त्याच्याकडे ४० एटीएम कार्ड, २६ बँकांचे पासबुक, ७४ चेकबुक सापडले.

सिडको एन-५, सह्याद्रीनगर येथे राहणाऱ्या आणि खासगी नोकरी करणाऱ्या या महिलेची नोव्हेंबर २०२० मध्ये सोशल मीडियावर लिल चांग अँडर्सन नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. त्याने मी तुमच्या मुलांना दिवाळीच्या भेटवस्तू म्हणून सोन्या-चांदीचे दागिने, बूट, मोबाईल आणि पैसेही पाठवत असल्याचे सांगितले. तीन दिवसांनी एका अनोळखी क्रमांकावरून तुमचे पार्सल सोडवण्यासाठी विशिष्ट बँक खात्यावर ३० हजार रुपये भरा, असे सांगण्यात आले. ही रक्कम भरल्यावर आंतरराष्ट्रीय प्रक्रिया, विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे, शासकीय बाबींची मान्यता आदी कारणे सांगत पैसे मागितले. २१ लाख ५० हजार ३५५ रुपयांचा भरणा केल्यावर फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने पोलिसांकडे धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...