आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीच्या सुपर स्पेशालिटीमध्ये मुत्रशल्य चिकित्सा विभाग सुरू:पहिल्या दिवशी 50 रुग्णांची तपासणी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद घाटीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गेल्या तीन वर्षापासून बांधून तयार आहे. मात्र याठिकाणी अद्याप विविध विभाग सुरू झालेले नाही. गुरुवारी युरोलॉजी विभागाचा बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. तसेच आगामी काळात इतर विभाग देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली आहे.

मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलचे मूत्रशल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉक्टर व्यंकट गीते औरंगाबादच्या घाटी विभागात रुजू झाले आहेत. त्यामुळे सुपर स्पेशालिटीमधील यूरोलॉजीची ओपीडी गुरुवारपासून त्यांनी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी जवळपास 50 रुग्ण तपासण्यात आले आहेत.

दोन दिवस चालणार ओपीडी

याबाबत व्यंकट गीते यांनी सांगितले की, सोमवार आणि गुरुवार असे दोन दिवस यूरोलॉजी विभागाची ही ओपीडी चालणार आहे. तर उर्वरित दोन दिवस हे ऑपरेशनसाठी आणि त्यानंतरचे दोन दिवस हे ऑपरेशन करण्यात आलेल्या पेशंटला पाहण्यासाठी ठेवण्यात आल्याचे नियोजन केले असल्याचे डॉक्टर व्यंकट गीते यांनी सांगितले. गीते गेले पाच वर्ष मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजी विभाग प्रमुख होते .

चतुर्थ श्रेणी स्टाफची कमतरता

सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला विविध विभाग सुरू करण्यात आल्यामुळे नर्स आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे किमान 50 जणांचा स्टाफ कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावा अशी मागणी सुपर स्पेशलिटी विभागाच्या वतीने अधिष्ठातांकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये 25 चतुर्थ श्रेणी कर्मचारी तर 25 नर्सचा समावेश आहे.

अँजिओग्राफी सुरू

घाटी मध्ये सध्या कंत्राटी स्वरूपात चतुर कर्मचारी घेण्यात आलेले आहेत. त्यांनाच अतिरिक्त आणखी 25 कंत्राटी कर्मचारी मागवले तर कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न सुटू शकेल. तसेच स्थानिक पातळीवर नर्सची नियुक्ती केल्यास नर्सच्या समस्येचा प्रश्न देखील सुटू शकेल असे चौधरी यांनी सांगितले. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सध्या हृदयरोग विभागाची ओपीडी सुरू असून अँजिओग्राफीची ऑपरेशन्स देखील सुरू करण्यात आलेले आहेत

बाईट सुधीर चौधरी विशेष कार्यकारी अधिकारी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

बातम्या आणखी आहेत...