आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जैव ऊर्जास्रोतांचा वापर खर्च वाचवणारा, पर्यावरणपूूरक

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैव ऊर्जास्रोतांचा वापर पर्यावरणपूरक तर आहेच, पण खर्चही तुलनेत निम्म्यापेक्षा कमी होतो. याशिवाय महिलांच्या आरोग्याला सुरक्षित करणारा आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांकडून आधुनिक जैव ऊर्जास्रोतांकडे वळण्यासाठी भारतात शेतीतून मिळणारा टाकाऊ माल मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात घराघरापर्यंत जैव ऊर्जास्रोतांची चळवळ घेऊन जाणे महत्त्वाची बाब आहे, असे वर्ल्ड बायोएनर्जी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्रिस्टिएन रोकस यांनी अधोरेखित केले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या सहकार्याने वर्ल्ड बायोएनर्जी असोसिएशनची परिषद औरंगाबादेत झाली. इकोसेन्सच्या संचालक केतकी कोकीळ यांची आयोजनात महत्त्वाची भूमिका होती.

यामध्ये (इंडियन बायोएनर्जी अँड क्लायमेट चेंज) ‘भारतीय जैव ऊर्जास्रोत आणि वातावरण बदल’ या विषयावर विविधांगी चर्चा करण्यात आली. अपारंपरिक जैव ऊर्जास्रोतांवर आधारित गॅस सध्याची सर्वात महत्त्वाची गरज असल्याने या पद्धतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन परिषदेत करण्यात आले. यासोबतच इको व्हेइकल, सोलार एनर्जी पॅनल अशा विविध अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या उत्पादनांवरही चर्चा झाली.

धोरणकर्त्यांना महत्त्व लक्षात येणे गरजेचे : पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर केल्याने जंगले नष्ट होत आहेत. महिला, मुलांमध्ये फुफ्फुसाचे आजार वाढले. गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशा वेळी आधुनिक जैव ऊर्जास्रोतांचा वापरच पर्याय आहे, याची जाणीव धोरणकर्त्यांना करून देणे गरजेचे आहे, असे संचालक कुममुरू भारद्वाज यांनी म्हटले.

छोट्या जागेतील ‘वायू’ आकर्षण
पुण्याच्या चक्राकार लाइफस्टाइल सोल्युशन्सचे प्रियदर्शन यांनी ‘वायू’ बायोगॅस निर्मिती करणारे उत्पादन सादर केले. घरगुती वापराचा गॅस अत्यंत कमी जागेत फक्त कचऱ्यातून निर्माण केला जातो. यामुळे दुर्गंधी पसरत नाही किंवा इतर काही अडचणी येत नाहीत. औरंगाबादेतच २० ठिकाणी गॅस तयार करून घरगुती वापरही सुरू असल्याचे प्रियदर्शन म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...