आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्राने उभारलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी डॉक्टर, नर्स, कर्मचारी नसल्यामुळे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे दिव्य मराठीने उघडकीस आणले. या वृत्ताबाबत औरंगाबादच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपरस्पेशालिटीच्या रिक्त जागा भरण्याची व घाटीसाठी अतिरिक्त निधीची मागणी केली. यावर लवकरच पदे भरण्याचे संकेत मिळाल्याचे कळते. हाफकिनच्या माध्यमातून औषध खरेदीऐवजी मुख्य सचिवाच्या माध्यमातून हाय पॉवर कमिटी नेमण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून राज्यात औषध खरेदी करण्यात येणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
जिल्हा नियोजन आढावा बैठकीच्या प्रारंभीच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त जागांची समस्या मांडली. येथील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची भरती लवकरच करण्याचे संकेत त्यांना दिले..
हाफकिनबाबत हाय पॉवर कमिटी नेमली जाणार खासदार इम्तियाज जलील यांनी हाफकिनमुळे औषधाची खरेदी उशिरा होत असल्याबद्दल विषय बैठकीत माडंला. त्यावर फडणवीस यांनी याबाबत मुख्य सचिवाच्या माध्यमातून हाय पॉवर कमिटी नेमण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून आगामी काळात खरेदी करण्यात येईल. याबाबतचा निर्णय आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकप्रतिनिधींनी मागितला घाटीसाठी अतिरिक्त निधी या बैठकीत आमदार प्रदीप जैस्वाल, खासदार इम्तियाज जलील, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी घाटी आणि सुपरस्पेशालिटी विषयावर चर्चा केली. घाटीत १४ जिल्ह्यांतील रुग्ण दवाखान्यात येतात. त्यामुळे यासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच घाटीच्या इमारतीचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यावर फडणवीस यांनी तुम्ही सर्व प्रस्ताव सादर करा, तुम्हाला राज्याच्या बजेटमधून वेगळा निधी दिला जाईल अशा सूचना केल्या. मात्र कुठलीही घोषणा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.