आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विभागात भरती:राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे 2 महिन्यात भरणार - गिरीश महाजन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात डॉक्टर कर्मचारी यांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, मी मंत्री झाल्यानंतर या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्यांदा 1432 निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. तर 778 डॉक्टरांचे एमपीएससी नुसार भरती करण्यात येणार आहे. तर गट क चे 4500 पदे तसेच गट ड 3874 पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत या सर्व जागा भरण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते घाटी मध्ये अवयव प्रत्यारोपण जनजागृती कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सहकार मंत्री अतुल सावे रोहयोमंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार इम्तियाज जलील भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे आमदार प्रशांत बंब भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर ,बसवराज मंगरूळे यासह वैद्यकीय सह संचालक अजय चंदनवाले अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कल्याणकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पैठणचे रुग्णालय 100 बेडचे करा- भुमरे

पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की पैठण मोठे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावी येतात त्यामुळे सध्या पैठणमध्ये तीस बेडचे असलेले रुग्णालय 100 बेडचे करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे.याबाबतचा प्रस्ताव देखील पाठवला आहे. रुग्णालय 100 झाल्यास पैठण सह सर्व ग्रामीण भागात मोठा आरोग्याच्या सुविधांचा लाभ मिळेल त्यामुळे त्याला मान्यता देण्यात यावी अशी मागणी त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. त्यावर गिरीश महाजन यांनी पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना आरोग्याच्या सुविधा देणे गरजेचे आहे त्यामुळे पैठणमध्ये शंभर बेडच्या रुग्णालयांना मान्यता देण्यात येणार असल्याची घोषणा महाजन यांनी यावेळी केली.

घाटीतल्या रिक्त जागा भरा - जलील

खासदार इम्तियाज जलील यांनी घाटीत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत त्यामुळे ही रिक्त पदे भरण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच घाटीतल्या प्रसिद्धी विभागात जाऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी पाहणी करावी प्रसूती झालेल्या महिला बेड नसल्यामुळे फरशीवर झोपलेल्या असतात. मी याबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली असल्याचे जलील यांनी सांगितले.

माझे सर्व अवयव दान करणार - दानवे

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अवयव दान चळवळीचे महत्त्व सांगताना माझ्या मृत्यूनंतर माझे सर्व शरीरच दान करणार असल्याचे घोषणा केली.