आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग झाल्याने देशात दरवर्षी ६७ हजार महिलांचा मृत्यू होतो. महिलांना होणाऱ्या विविध कर्करोगांत हा पहिल्या क्रमांकाचा कर्करोग असल्याचे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यामुळे देशाच्या लसीकरण कार्यक्रमात गर्भपिशवी मुख कर्करोग प्रतिबंधात्मक लसीचा समावेश करण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत माेफत लसीकरण सुरू होईल. यामुळे गर्भपिशवीच्या मुख कर्करोगाचे समूळ उच्चाटन होईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ने तज्ज्ञ डाॅक्टरांशी चर्चा केली. यामध्ये लक्षणे, कारणे, उपाययोजना आणि उपचार यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
९ ते २६ वर्षांच्या मुलींना डोस सव्हार्यकल (गर्भपिशवी मुख कर्करोग) कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढल्याने यावर मात करण्यासाठी लसीकरण केले पाहिजे, अशा सूचना संघटनेने केल्या हाेत्या. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यात आला आहे. ९ ते २६ वयोगटातील मुलींचे लसीकरण केले जाईल. - डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख, घाटी
आरोग्याकडे दुर्लक्ष हे प्रमुख कारण कर्करोग म्हणजे मृत्यू हे समीकरण आता मागे पडले आहे. समाजात महिलांच्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ९० टक्के प्रकरणात शेवटच्या टप्प्यांत आजाराचे निदान होते. सुशिक्षित आणि जागरूक कुटुंबातही महिला स्वत:च्या आरोग्याबद्दल असंवेदनशील असतात. उपचार सुरू केल्यानंतर ते अर्धवट सोडणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. कर्कराेगात भारत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. - डॉ. आस्फिया खान, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट
लसीकरणाने समूळ उच्चाटन गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग असलेल्या ९९८ महिलांवर आम्ही वर्षभरात उपचार केले. महिलांच्या कर्करोगात भारत पाचव्या क्रमांकावर असल्याने लसीकरणाच्या सूचना डब्ल्यूएचओने दिल्या आहेत. सर्व्हयाहॅक ही भारतीय बनावटीची लस तयार आहे. येत्या ६ महिन्यांत ती दिली जाईल. यामुळे कर्करोगाचे समूळ उच्चाटन होईल. - डॉ. अर्चना राठोड, स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख, कर्करोग रुग्णालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.