आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवा; नसता 500 रुपये दंड आकारणार; लॉकडाऊननंतर मनपाचा कारवाईचा विचार

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

कोरोनावर लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळेच मनपाने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी जम्बो मोहीम हाती घेत ११५ वॉर्डांत लसीकरण सुरू केले आहे. ३० एप्रिलनंतर तर लस न घेणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांवर कारवाई होणर आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवा, अन्यथा ५०० रुपये भरा, अशा कारवाईचा विचार केला जात असल्याचे प्रशासक अास्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागातून उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांसाठी त्यांचे नातेवाईक व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी धावपळ करीत आहेत.

शहरात आतापर्यंत १ लाख ९० हजार नागरिकांचे लसीकरण झाले. शहरात सरकारी खासगी मिळून ४३ केंद्रांत लसीकरण केले जात आहे. ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकाचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा मानस आहे. परंतु या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घेतले नाही तर कडक कारवाई केली जाईल.

पाच लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट शहराची लोकसंख्या साधारणपणे १५ ते १६ लाख इतकी आहे. सध्या दहा टक्के लसीकरण झाले आहे. जूनपर्यंत ५ लाख लाेकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट मनपाने ठरवले आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असल्यामुळे त्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरात ४० ते ५० टक्के लसीकरण व्हावे, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...