आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Vadapav, Railways To Run On Fried Oil, Central Government's Biofuel Production Project; Accelerate The Process Of Collecting Used Oil Across The Country

दिव्य मराठी विशेष:वडापाव, समाेसे तळलेल्या तेलावर भरधाव धावणार रेल्वे, केंद्र सरकारचा जैव इंधन निर्मितीचा प्रकल्प; वापरलेले तेल देशभरातून जमा करण्याची प्रक्रिया वेगात

औरंगाबाद (एकनाथ पाठक)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वडापाव, कचाेरी व समाेसा तळलेल्या तेलाच्या वापरातून वेगाने ट्रेन धावणार आहेत. केंद्राचे अन्न व औषध प्रशासन हा प्रकल्प राबवणार अाहे. तळलेल्या तेलाचा अधिकाधिक वापर आराेग्यासाठी घातक आहे. हाच धाेका टाळण्यासाठी अन्न व औषधी मंत्रालयाने याच तेलातून जैव इंधन निर्मितीसाठीचे काम राजस्थानमधील ब्ल्यू स्टाेन या कंपनीला दिले. तेलाचा पुनर्वापर रोखण्यासाठी “रिर्पपस यूज्ड कुकिंग ऑइल’ म्हणजेच “रूको’ हा उपक्रम सुरू केला. याच एकत्र केलेल्या तेलातून जैव इंधन तयार करण्यात येणार आहे. जैव इंधनातून देशभरात ट्रेन व इतर वाहने रस्त्यावर धावणार आहेत. बायाे डिझेल निर्मितीचा प्राेजेक्ट सध्या राजस्थानमध्ये सुरू आहे.

कढईतील तेलाचा हिशेब, उरलेले जमा
हॉटेल, रेस्टॉरंट, मेस, कँटीन व केटरर्स तळण्यासाठी ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेल वापरत असतील, तर यापुढे त्यांना सरकारलामाहिती द्यावी लागेल. किती वापरले, किती उरले याचा हिशेब ठेवावा लागेल. सरकारने उरलेल्या तेलापासून जैवइंधन तयार करण्याचे ठरवले आहे. तेल गोळा करण्यासाठी महाराष्ट्रासाठी कास्माे एजन्सीही नेमण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम १६ (१५) अन्वये तेल पुनर्वापरावर बंदी आणली.

तेल कलेक्शन
रिकोने प्रमाणित केलेल्या हॉटेलवरून हे तेल कंपनीचे प्रतिनिधी कलेक्शन करतील. यानंतर हे तेल प्रक्रियेसाठी पाठवले जाईल. हॉटेलशी झालेल्या करारानुसार तेल किती दिवसात न्यायचे हे निश्चित केले जाणार आहे.

गुजरात, दिल्ली आघाडीवर
बायाे डिझेल प्रकल्पासाठी देण्याच्या माेहिमेमध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश राज्य आघाडीवर आहेत. एकट्या गुजरात राज्यातून १३६ टनांपेक्षा अधिक तेल जमा केले जाते. त्यापाठाेपाठ दिल्लीमध्ये यासाठी अधिक जनजागृती झाली आहे. येथून १४१ टन तेल जमा केले. याशिवाय काेलकात्यातून ३१.५ टन, वाराणसी व सिकरमधून १५.५० टन, इंदूर आणि भाेपाळमधून २०.३३ टन तेल जमा करण्यात येत आहे.

हाॅटेल्स हाेणार रिकाे प्रमाणित : रिकाेच्या (रिपर्पज युज कुकिंग ऑइल) संकल्पनेतून आता हाॅटेल्समध्ये वापरलेले तेल जमा करण्यात येत आहे. यामुळे आता अशा प्रकारे एकदा वापरलेले तेल पुन्हा वारले जात नसल्याचे प्रमाणपत्र केंद्राकडून या हाॅटेल्सला दिले जाते. तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने हृदयविकार, ब्लडप्रेशर, यकृताचे आजार, कॅन्सर, अपचन यासारखे दुर्धर आजार हाेत आहेत.

तीन जिल्ह्यांची निवड
केंद्राच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातूनही वापरलेले तेल जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी राज्यातील औरंगाबाद, पुणे आणि मुंबई शहरात ही माेहीम राबवली जात आहे. औरंगाबादची यासाठी पहिल्यांदा निवड झाली. काॅस्माे कंपनीचे औरंगाबाद येथून ३० टन तेलाचे उद्दिष्ट आहे. याच संख्येत पुणे व मुंबई येथून तेल संपादन केले जाते.अशी माहिती अन्न व अाैषधी प्रशासनचे सहायक अायुक्त शाह यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...