आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बेलगाव शिवारात रविवारी दुपारी घडली. कपिल किरण त्रिभुवन (२३) व पीयूष विजय जिवडे (वय ८, रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.
जागरण गोंधळ करणारे वाघे हे कासली येथे कार्यक्रम करण्यासाठी जात असताना बेलगाव शिवारात आराम करण्यासाठी थांबले. त्यांच्या सोबत असलेला चिमुकला पीयूष विजय जिवडे हा खेळत असताना नकळत बेलगाव शिवारातील गट क्रमांक १६० मधील किरण पांडुरंग त्रिभुवन यांच्या शेतात गेला. खेळताना तेथील शेततळ्यात तो पडला व बुडू लागला.
हे लक्षात येताच कपिल त्रिभुवनने चिमुकल्याला वाचवण्यासाठी धाडसाने शेततळ्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडला. दुर्दैवाने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिस नाईक सिंगल व पोलिस पाटील अनिल धीवर यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढून वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
कपिल हा एकुलता एक होता. तो कोपरगाव येथील संजीवनी महाविद्यालयात अभियांत्रिकीमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.