आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Valentine Day 2022 | Aurangabad Valentine Day | Auranagabad Police | When The Police Called, The Mother Said The Girl Had Gone To Tuition, Which Was Actually In The Tomb Area

पोलिसांमुळे व्हॅलेंटाइन ‘दीन’वाणा:पोलिसांनी फोन केला तर आई म्हणाली, मुलगी ट्यूशनला गेली, प्रत्यक्षात होती मकबरा परिसरात

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मकबरा परिसरात घोळका करून बसलेल्या तरुण-तरुणींना महिला पोलिसांनी हुसकावून लावले.

पोलिसांनी सोमवारी शहराच्या अनेक भागांत करडी गस्त घातली. सार्वजनिक तसेच निर्जन ठिकाणी प्रेमकुंजन करणाऱ्या युगुलांना हुसकावून लावले. त्यामुळे कोरोनाचे संकट ओसरल्यावर आलेला व्हॅलेंटाइन डे पोलिसांनी ‘दीन’वाणा केल्याचे चित्र दिसून आले. एकेकाळच्या शिवसैनिकांची जागा पोलिसांनी घेतल्याची भावना तरुणाईकडून व्यक्त झाली.

२०-२१ वर्षांपूर्वी शिवसेना जिल्हाध्यक्ष, विद्यमान आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी १४ फेब्रुवारीला निराला बाजार येथे प्रेमीयुगुलांना मारहाण केली होती. त्यापुढील दोन-तीन वर्षे व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी शिवसैनिकांची पथके शहरभर फिरत होती. शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे हा प्रेम दिवस ‘दीन’ झाला होता. नंतर प्रेमीयुगुलांनी निराला बाजारऐेवजी निर्जन जागा शोधल्या. पुढे आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा सेनेची सूत्रे आल्यावर त्यांनी प्रेमदिनाला विरोध नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे युगुले काहीशी सुखावली होती. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंधने होती. तिसरी लाट ओसरल्याने प्रेम दिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही.

तरुण-तरुणी जेथे मोठ्या संख्येने जमतात अशा कॅनॉट परिसर, औरंगाबाद लेणी, विद्यापीठ परिसर, बीबी का मकबरा, गोगाबाबा टेकडी, विविध उद्यानांत दामिनी पथक धडकले. पुन्हा या ठिकाणी दिसून आलात तर कायदेशीर कारवाई करू, असा दमही दिला. बीबी का मकबऱ्याच्या मागील निर्जन जागी असलेल्या एका मुलीच्या आईला पथकातील कर्मचाऱ्याने कॉल करून विचारणा केली तेव्हा माझी मुलगी ट्यूशनला गेल्याचे त्या मातेने सांगितले. मग पथकाने त्या मुलीची जोरदार कानउघाडणी केली. वाळूज येथून आलेल्या मुलींना जाब विचारला. निर्जन जागी असे बसता आणि उद्या काही अघटित घडले तर जबाबदार कोण, असा प्रश्नही हे पथक मुला-मुलींना विचारत होते.

दुपारी १२ ते रात्री आठ वाजेपर्यंत ४५ ते ५५ किलोमीटरचा फेरफटका मारत ही मोहीम झाली. ३० ते ३५ प्रेमीयुगुलांचे समुपदेशन करण्यात आले. पथकात उपनिरीक्षक सुवर्णा उमप, निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, संगीता दांडगे, अश्विनी चिकाटे यांचा समावेश होता. निर्जन ठिकाणी बसलेल्या युगुलांना दामिनी पथकाने हुसकावले; काहींना ताब्यात घेऊन नंतर समज देत साेडून दिले

बहुतांश मुली अल्पवयीन
प्रेमीयुगुलातील बहुतांश मुली अल्पवयीन होत्या, असे दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे यांनी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला सांगितले. आम्ही पोलिस म्हणून आमची जबाबदारी पार पाडत आहोतच, पण पालकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘व्हेलेंटाइन डे’ला नाही, पाश्चात्त्य संस्कृतीला विरोध
त्या वेळी आमचा विरोध व्हॅलेंटाइन डेला नव्हे, तर पाश्चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणाला होता म्हणूनच आक्रमक भूमिका घ्यावी लागली. आता २१ वर्षांनंतर मुले-मुलींना विरोध का करायचा? अर्थात, जेथे चुकीचे किंवा बेकायदेशीर घडत असेल तेथे विरोध असणारच. मी दरवर्षी १४ फेब्रुवारीला मातृ-पितृ पूजन सोहळ्याचे आयोजन करतो. यंदा १० फेब्रुवारीपर्यंत पक्षाचेच कार्यक्रम सुरू असल्याने वेळ मिळाला नाही. - अंबादास दानवे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना

बातम्या आणखी आहेत...