आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:आघाडी सरकारने केली ओबीसींची दिशाभूल; वंचित बहुजन आघाडीचे प्रा. नागोराव पांचाळ यांची टीका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
भागवत पांचाळ यांची राज्य सचिवपदी निवड - Divya Marathi
भागवत पांचाळ यांची राज्य सचिवपदी निवड
  • विश्वकर्मा वंशीय समाजाचा वेरूळला ऑनलाइन मेळावा

पाच ऑक्टोबरला ५ जिल्ह्यात पोटनिवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी कोट्यातील जागा रद्द केल्याने पाचही जिल्ह्यांत ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी नमानिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळेच सरकारने जो अध्यादेश काढला आहे तो म्हणजे ओबीसींची दिशाभूल करण्याचे षड््यंत्र आहे. यामुळे ओबीसींना आरक्षण मिळणारच नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रा. नागोराव पांचाळ यांनी केली. विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त विश्वकर्मा वंशीय समाजातील सुतार, लोहार, सोनार, शिल्पी, तांबट समाजाचा महामेळावा वेरूळ येथे संघटनेतर्फे १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. या वेळी पांचाळ बोलत होते.

कार्यक्रमात डॉ. चक्रपाणि चोप्पावार यांनी ‘समाज उत्पत्तीचा सिद्धांत’, जितेश मेश्राम यांनी ‘अमृतमहोत्सवी विश्वकर्मा समाजाची स्थिती’ आणि रामानंद तपासे यांनी ‘समाजाचा इतिहास व भविष्यातील वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन केले. दरवर्षी वेरूळ येथे महंत महेंद्र बापू यांच्या उपस्थितीत मेळाव्यासाठी राज्यभरातून समाजबांधव उपस्थित राहतात. यंदा कोराेनामुळे हा मेळावा ऑनलाइन घेण्यात आला. कार्यक्रमात विश्वकर्मा आरती, पूजनानंतर रक्तदान शिबिराचे अायोजन देविदास पांचाळ यांनी केले होते.

प्रदेशाध्यक्ष दिलीप दीक्षित यांनी संघटनेचे महत्त्व सांगून वेरूळ येथे समाजबांधवांनी आले पाहिजे, असे सांगितले. या वेळी बजरंग खरजुले, विलास पवार, डॉ राजू पोपळघट, अजय धर्माधिकारी, आदिनाथ भालेकर, संजय बोराडेंनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण भालेकर, तर प्रास्ताविक संजय बोराडे यानी केले. संघटनेचे गोपाल राऊत, दादाराव शिंदे, मंगेश सपकाळ, गणेश आंबेकर, संदीप भालेकर गणेश गव्हाणे, किशोर भागवत, ज्ञानेश्वर रायमल, ज्ञानेश्वर इंगले, गणेश आढाव, ज्ञानेश्वर मानतकर, केशव सपकाळ, बालू रायमल,अशोक देशमाने, विनोद देशमाने, नागेश साखरे, रमेश काळे, बालाजी पांचाळ यांनी मेहनत घेतली. थोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

भागवत पांचाळ यांची राज्य सचिवपदी निवड
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या राज्य सचिवपदी भागवत पांचाळ यांची सर्वानुमते संघटनेचे अध्यक्ष नागोराव पांचाळ यांनी निवड केली. भागवत पांचाळ हे संघटनेमध्ये राज्य प्रसिद्धिप्रमुखपदी होते. त्यांचा समाजाविषयीचा अभ्यास, संपर्क, काम करण्याची तळमळ पाहता राज्य सचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. समाजबांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...