आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेनेच्या युतीची चर्चा आहे. तसे झाल्यास औरंगाबाद शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात नेमके काय होईल, याची चाचपणी केली असता दोन्ही पक्षांना युतीचा फारसा फायदा होणार नाही, असे दिसत आहे. दोघांना एकत्रित येऊन मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
२०१९ विधानसभेला तत्कालिन शिवसेना-भाजप युती होती. औरंगाबाद मध्यमधे सेनेचे प्रदीप जैस्वाल यांना ८२,२१७, एमआयएमचे नसिर सिद्दीकींना ६८,३२५ तर वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांना २७,३०२ मते मिळाली. जैस्वाल यांना भाजप समर्थक ४० हजार मते मिळाली, असे २०१४ ची आकडेवारी सांगते. त्यामुळे आगामी लढतीत वंचित बहुजनची २७ हजार मते उद्धव सेनेला मिळाली तरी भाजपच्या ४० हजार मतांचा खड्डा भरून काढणे कठीण आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये वंचितला २५,६४९ तर सेनेला ८३,७९२ मते मिळाली. तर पूर्वमध्ये एमआयएमचे उमेदवार डॉ. काद्री यांनी वंचितचा पाठिंबा मिळवला होता. त्यांना ८०,०३६ तर भाजपचे अतुल सावे यांंना ९३,९६६ मते मिळाली.
निवडणुकांचे अभ्यासक सारंग टाकळकर म्हणाले की, या युतीचा विधानसभेला तरी दोन्ही पक्षांना फारसा फायदा होणार नाही. मात्र, औरंगाबाद महापालिका निवडणुकीमध्ये चार प्रभाग किंवा नऊ वॉर्डांमध्ये व्यवस्थित यंत्रणा राबवली तर वंचित, उद्धवसेनेला चांगला फायदा होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.