आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद मधील 44 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. वंदे मातरम सभागृह बांधून दोन महिन्यापूर्वीच तयार झाले होते. मात्र मुख्यमंत्र्याची वेळ मिळत नसल्यामुळे सभागृहाचे उद्घाटन रखडले होते.
हैद्राबादमुक्ती संग्रामाच्या वेळी ज्या सैनिकांनी मोठा लढा दिला होता. त्यांच्या स्मरणार्थ हॉल बांधून त्यास वंदेमातरम नाव द्यावे अशी मूळ कल्पना होती. 16 फेब्रुवारी 2014 रोजी याच्या नकाशास मान्यता देण्यात आली. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2014 मध्ये बांधकामास मंजुरी देण्यात आली. तर 6 नोव्हेबर 2014 मध्ये मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमीपुजन पार पडले. त्यानंतर आठ वर्षानंतर हे बांधकाम पूर्ण झाले आहे.
दोन केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
या उद्घाटनासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष उपस्थिती म्हणून रोहयोमंत्री संदिपान भुमरे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सहकार मंत्री अतुल सावे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच खासदार इम्तियाज जलील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत .शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वंदे मातरमचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी जिल्हाधिकारी अस्तित्वात पांडे यांनी गुरुवारी वंदे मातरम सभागृहाची पाहणी केली. यावेळी विविध अधिकारी देखील उपस्थित होते.
या आहेत सुविधा
औरंगाबादमध्ये या निमीत्ताने भव्य वास्तु पाहिल्यांचा अनुभव देखील ही वास्तु पाहिल्यानंतर येतो. या भुखंडाचे क्षेत्रफळ - 2 एकर (8033.67 चौ.मी.) असून यामध्ये विवीध सुविधा आहेत. यामध्ये 1050 आसन व्यवस्था असलेले सभागृह आहे. अतिशय चांगल्या खुर्च्या वेगवेगली लाईटची व्यवस्था असलेले हे सभागृह आहे. तर 250 व्यक्तींची क्षमता असलेले अँम्फी थिएटर या सौदर्यात भर टाकणारे आहे. तसेच कला दालन, प्रदर्शन केंद्र 100 लोकांचा सहभाग असणारे परिसंवाद व्यासपीठ, कलावंत आणि अतिमहत्वाच्या व्यक्तीकरिता निवास व्यवस्था, 100 कार व 200 दुचाकी तसेच 100 सायकलीकरिता वाहनतळ, नागरिकांकरिता प्लाझा , प्रशासकीय कार्यालय, अपंगांकरिता स्वतंत्र रॅमची व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गासह अग्निशामक यंत्रणा अशी सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.