आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय महिला दिन:भावसार समाजातर्फे उद्या महिलांसाठी विविध स्पर्धा

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया भावसार क्षत्रिय समाज महासभेच्या शाखा छत्रपती संभाजीनगरतर्फे रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भावसार महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. टिळकनगर येथील व्यंकटरमण बालाजी मंदिरात सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, कर्तृत्ववान महिलांवर आधारित वेशभूषा स्पर्धा होणार आहे. प्रत्येक स्पर्धेमधून प्रथम व द्वितीय असे दोन क्रमांक काढण्यात येणार अाहे. एक उत्तेजनार्थ बक्षीस काढण्यात येईल. इच्छुक महिलांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुषमा भावसार- ९४२०८०८०९०, साक्षी भावसार-८२७५२३८५८६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...