आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Various Issues Raised By Aurangabad First; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

वाहतुकीसह विविध समस्यांची चर्चा:औरंगाबाद फर्स्टने मांडल्या विविध समस्या ; ​​​​​​​पालकमंत्री भुमरे यांना निवेदन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक, पर्यटनासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद फर्स्टच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याशी संवाद साधला. शहराचा विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे, असे या वेळी भुमरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

माजी अध्यक्ष ऋषी बागला, मानसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार यांनी बैठकीचे प्रयोजन सांगितले. अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. बागला यांनी औरंगाबाद शहर हे देशातील पुढील महानगर होण्यासाठी कसे तयार आहे, याची वस्तुस्थिती सांगितली. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी पर्यटन क्षेत्रातील संधी, समस्या व उपाय यावर भाष्य केले. पालकमंत्र्यांनी औरंगाबाद आणि पैठण येथील प्रस्तावित कामांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.

अनेक दीर्घकालीन, अल्पकालीन उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यातील काही प्रमुख मुद्द्यांवर निकटच्या भविष्यात काम करण्याचे ठरले. यावेळी उपाध्यक्ष अनिल माळी, डॉ. सुनील देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. शांतिलाल सिंघी, रवींद्र कोंडेकर, अशोक काळे, अरुणकुमार सेनगुप्ता, हबीब शेख, सुनील चौधरी, राजेश मानधनी, जगन्नाथ काळे, जसवंत सिंग, विजय जैस्वाल उपस्थित होते. कार्यकारी सचिव हेमंत लांडगे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...