आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:वाहनांचा ताफा थांबवून अपघातातील दोन्ही जखमींना पालकमंत्री, खासदारांकडून मदत

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मसोड पाटीजवळ अपघातग्रस्तांची चौकशी करताना पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, खासदार अॅड. राजीव सातव.

कळमनुरी ते हिंगोली मार्गावर मसोड पाटीजवळ गुरुवारी सायंकाळी ५ वाजता अपघातग्रस्त वाहन दिसताच पालकमंत्री वर्षा गायकवाड व खासदार अॅड. राजीव सातव यांनी वाहनांचा ताफा थांबवून दोन जखमींना तातडीने उपचारासाठी पोलिस वाहनाने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यामुळे जखमींना तातडीने आरोग्यसेवा मिळू शकली.

हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्या नांदेड येथे आल्या. त्यानंतर आखाडाबाळापूर मार्गे कळमनुरी येथे येऊन खासदार अॅड. राजीव सातव यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पालकमंत्री प्रा. गायकवाड व खासदार अॅड. सातव हिंगोलीकडे निघाले होते. सायंकाळी पाच वाजता त्यांच्या वाहनांचा ताफा कळमनुरी येथून हिंगोलीकडे येत होता.

या वेळी हिंगोली येथून कळमनुरीकडे श्रीनिवास बाजीराव पाईकराव (२०) व बाजीराव महादू पाईकराव (५०, दोघे रा. कळमनुरी) हे दोघेजण त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोली येथून कळमनुरीकडे जात होते. त्यांचे दुचाकी वाहन मसोड पाटीजवळ आले असताना त्यांच्या वाहनावर अचानक एका वानराने उडी मारली. त्यामुळे श्रीनिवास पाईकराव यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोघेही रस्त्याच्या बाजूला पडले. हा प्रकार तेथून जाणाऱ्या पालकमंत्री प्रा. गायकवाड व खासदार अॅड. सातव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहनांचा ताफा थांबवला. दोन्ही जखमींना उपचारासाठी पोलिस वाहनातून कळमनुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

0