आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणतीही मागणी नसताना तब्बल 378 दिवस चाललेले शेतकरी आंदोलन संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय बनले. व्हॉटसअप, व्टिटर, फेसबुकच्या दिशाभूल करणाऱ्या युगात सत्ताधीशांना कायदे मागे घेण्यास भाग पाडणाऱ्या शेतकरी आंदोलानाचा आत्मा होते, गांधी विचार.‘ज्यांच्या गळ्यात कोणताही गमचा नाही, त्यांच्याच हातात हा देश आहे..’कारण इथे ‘टू मच डेमोक्रसी आहे‘, असा संदेश या आंदोलनाने संपूर्ण जगाला संदेश दिला.
यांची होती उपस्थिती
पराग पाटील निर्मित, वरुण सुखराज दिग्दर्शित ‘टू मच डेमोक्रसी’या 92 मिनीटांच्या माहितीपटाचे प्रदर्शन एमजीएमच्या व्ही. शांताराम चित्रपटगृहात झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या औरंगाबाद विभागीय केंद्रामार्फत चालवण्यात येणाऱ्या चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमजीएमचे कुलपती तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिव निलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
डोळ्यात अंजन घालणारा माहितीपट
शेतकरी आंदोलनाबद्दल कुठलीही माहिती नसताना किंवा सोशल मिडीयातून चुकीची माहिती मिळवणाऱ्या सो कॉल्ड सुशिक्षितांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा माहितीपट आहे. विविध अंगांनी अभ्यासले जायला हवे अशा या ऐतिहासिक आंदोलनाचा दस्तावेज म्हणजे हा माहितीपट आहे. शेतकरी आंदोलनाचा गाभा हा गांधी विचारधारा आहे. या आंदोलनापुर्वी नथ्थूराम सर्मथकांनी गांधीचा पुतळा जाळला होता. गांधींना पुन्हा एकदा मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. पण, शेतकरी आंदोलनातून गांधी अधिक व्यापक आणि सर्वकाळ जीवंत आहेत, याची प्रचिती आली. आंदोलनाची सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने घटना घडत गेल्या, पंजाबच्या शेतकऱ्यांनी कायद्याचा अभ्यास आणि त्याविरुद्धचा लढा किती बारकाईने उभारला होता, याबद्दलचे तपशील वरुण यांनी बारकाईने यात टिपले आहेत. विशेष म्हणजे आंदोलनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असलेले व्यक्ती, आंदोलाना अभ्यासणारे व्यक्ती, मिडीयातील कव्हरेज, पोलिसांची भूमिका, राजकीय मतमतांतरे अशा विविध पैलूंना यामध्ये स्पर्श केला आहे.
अस्पर्शित राहील्या त्या महिला
खऱ्या अर्थान दुर्लक्षित झाला, अस्पर्शीत राहीला तो मुद्दा महिलांचा होता. शेतीचा शोध महिलांनी लावला, शेती कसण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा महिलांचा आहे. शेतकरी दिल्लीच्या सिमांवर सव्वा वर्ष तळ ठोकून होते तेव्हा घरी शेती करणाऱ्या महिला होत्या. या महिलांचा आंदोलनात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग दिग्दर्शक वरुण यांनी टिपला नाही, ही या माहितीपटाची कमकुवत बाजू ठरते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.