आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वसमतमध्ये विनापरवाना मद्य वाहतुकीच्या संशयावरून बॅगची तपासणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास तिघांची मारहाण

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथे विनापरवानगी मद्य वाहतुकीच्या संशयावरून बॅगची तपासणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (18 मे)  रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयात मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात आली आहे. परवानाधारक ग्राहकांनाच मद्य विक्री करावी अशा स्पष्ट सुचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे मद्याची वाहतुक करणाऱ्यांच्या परवान्यांची तपासणी केली जात आहे.

वसमत येथील काजीपुरा भागात दोघे जण एका बॅगमधून विना परवाना मद्याची वाहतुक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस कर्मचारी शेख महेबुब शेख इसाक हे दुचाकी वाहनावर तेथे गेले. त्यांनी शेख हब्बू शेख नुर याच्या जवळ असलेल्या बॅगची तपासणी सुरु केली तसेच परवाना दाखविण्याची सुचना केली. मात्र शेख हब्बू व अरफात उर्फ बब्बू खान रफिउल्लाखान यांनी पोलिस कर्मचारी शेख महेबुब यांना शिवीगाळ केली, तु तेरी ड्यटी कर, तुझे क्या करने का है असे म्हणत त्यांना दुचाकीवरून खाली ओढून मारहाण केली. तसेच अन्य एकाने शिवीगाळ केली. या प्रकरणी शेख महेबुब यांच्या तक्रारीवरून शेख हब्बू शेख नुर, अरफात उर्फ बब्बूखान रफिउल्लाखान याच्यासह अन्य एका विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील पुढील तपास करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...