आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकांनी काम वेळेत न केल्याने घेतला निर्णय:वसंत भवन; भाजीमंडीची जागा मनपा परत घेणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मनपाच्या जागा विकसित करण्यासाठी बीओटी तत्त्वावर देण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. मात्र, हा निर्णय चुकला आहे. मागील महिन्यात विकासकाला साडेचार कोटी रुपये देऊन मनपाने शहानूरवाडीतील श्रीहरी पॅव्हेलियनची जागा परत घेतली. दुसरीकडे दहा वर्षे झाली तरी वसंत भवन आणि औरंगपुरा भाजीमंडीचे काम रखडले आहे. त्यामुळे विकासकांना नोटीस देऊन या जागा परत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपाचे तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी २००६ साली बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरित करा) तत्त्वावर प्रकल्प उभारण्याचे धोरण स्वीकारले. २०११-१२ मध्ये प्रत्यक्ष हे काम सुरू झाले. त्यानंतर मनपाने एकापाठोपाठ एक बीओटी प्रकल्प मंजूर करून कोट्यवधींच्या अनेक मोक्याच्या जागा खासगी विकासकांच्या घशात घातल्या. यातील बहुसंख्य प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे जागा अडकून पडल्या आहेत. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियनचा बीओटी प्रकल्प पूर्ण झाला होता. मात्र, विकासकाने करारानुसार शुल्काचा भरणा केला नाही. त्यामुळे ती जागा परत घेतली. यात मनपाचा घाटा झाल्याची चर्चा आहे. तत्कालीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला हाेता.

विद्युत डीपीचा अडथळा
वसंत भवनचे विकासक एम.बी. पाटील कन्स्ट्रक्शन यांना मनपाकडून नोटीस दिल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. महावितरणच्या डीपीमुळे खाम खोळंबल्याचे सांगितले जाते. डीपी हटवण्यासाठी महावितरणला पत्र दिल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. वेळोवेळी विकासकाकडे पाठपुरावा केला. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

बातम्या आणखी आहेत...