आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पथकांची 60 गावांमध्ये जनजागृती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पथकांनी “माझा एक दिवस शेतकऱ्यांसाठी’ या मोहिमेत सुमारे ६० गावांमध्ये जनजागृती केली. विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी या महत्त्वाच्या योजनेला यशस्वी करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी ६० गावांतील शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवला.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कीटक आणि रोग व्यवस्थापन, रब्बी हंगामातील पीक नियोजन आणि सध्याचे पीक नियोजन अशा विविध विषयांवर शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी काही प्रश्नांची उत्तरे देऊन शंकासमाधान करण्यात आले. डिजिटल शेती, ब्रॉड बेड अँड फरो तंत्रज्ञान तसेच ड्रोनआधारित फवारणीविषयी बहुतांश शेतकऱ्यांना स्वारस्य आणि काही माहिती असल्याचे दिसून आले.

या मोहिमेसाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची २२ पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये ८० पेक्षा अधिक जणांचा सहभाग होता. त्यांनी ६० गावांतील दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर कोणते उपाय करावेत, याचीही माहिती दिली. त्यामुळे ही मोहीम अतिशय उपयुक्त ठरली.

बातम्या आणखी आहेत...