आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट असोसिएशन:वैदिक ज्ञान, जैवविविधता, सुसंवाद ही भारत देशाची प्रमुख बलस्थाने

औरंगाबाद / डॉ. पार्थो घोष15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात सध्या १४ हॉटस्पॉट आहेत, ज्या ठिकाणी कधीही युद्धस्थिती निर्माण होऊ शकते. या परिपेक्षात भारताची भूमिका महत्त्वाची ठरते. भारतीयांकडे असलेले वैदिक ज्ञानसंस्कार, जैवविविधता आणि निसर्गासोबतचा सुसंवाद ही बलस्थाने आहेत. त्याचा अधिकाधिक वापर केल्यास कलामांच्या स्वप्नातील महासत्ता असलेला भारत पुढे येईल यामध्ये यत्किंचितही शंका नाही. सध्या भारतात शासकीय संस्था विश्वास गमावत आहेत, तर अमेरिकेत लोकशाहीवरील विश्वास कमी होत आहे. जग संभ्रमावस्थेत आहे. भारत सध्या अशा स्थानी आहे, जिथे तो जगाला दिशा देऊ शकताे.

औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनचा उपक्रम
औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन आणि नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर देवगिरी इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, बजाजचे विश्वस्त सी. के. त्रिपाठी, एएमएचे अध्यक्ष सुनील देशपांडे, नाथ ग्रुपचे संचालक नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...