आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:भाजी विक्रेत्या महिलेचा बिडकीनमध्ये खून ; अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

बिडकीन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील नवीन गावठाण येथे एका ५५ वर्षीय महिलेचा गळा दाबून खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. जानकीबाई हरिदास महालकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला अनेक दिवसापासून भाजीविक्रीचा व्यवसाय करत होती. पतीचे निधन झाल्यापासून ती घरात एकटीच होती. बुधवारी रोजी सकाळी ८ वाजता एक रिक्षाचालक नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे आठवडी बाजाराचा भाजीपाला घेण्यासाठी आला, पण त्याला जानकाबाईच्या घराचा दरवाजा बंद दिसला. त्याने बराच वेळ दार वाजवले तरी जानकाबाई यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रिक्षाचालकाने पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने व इतर पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून बघितले असता जानकाबाई मृतावस्थेत आढळल्या. अधिक तपासणी केली असता त्यांचा गळा आवळलेला असल्याचे दिसून आले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेंगे, पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल आदींनीही घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक महेश घुगे हे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...