आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआकाशवाणी चौकात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यासाठी दोन स्टेज उभारले होते. परंतु, पुढील वर्षी महात्मा बसवेश्वरांच्या नवीन पुतळ्याच्या ठिकाणी एकत्रित येऊन जयंती साजरी करणार असल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.
महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा महोत्सव समितीतर्फे महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी वाहन रॅली काढून आकाशवाणी जवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस महानिरीक्षक के. एम. मलिकाअर्जुन प्रसन्ना, माजी खा. चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, शिवशंकर स्वामी, संजय केणेकर, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल, बसवराज मंगरुळे, ऋषीकेश खैरे, बंडू ओक, विलास कोरडे, शिवाजी दांडगे आदींची उपस्थिती होती.
मंगळवारी सकाळी किशोर नागरे, नितीन चित्ते, वीरभद्र गादगे यांच्या उपस्थितीत सिडको एम-२ येथून वाहन रॅलीला सुरुवात झाली. सदरील रॅली एन-१२ महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजित जागेपासून सुरुवात होऊन टीव्ही सेंटर, जैस्वाल हॉल, एम-२, बजरंग चौक, आविष्कार कॉलनी, कॅनॉट, सिडको चौक, जयभवानीनगर, गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, संत एकनाथ रंग मंदिर, क्रांती चौक, मोंढा नाका मार्गे आकाशवाणी येथे समारोप करण्यात आला. या रॅलीत दीडशे ते दोनशे दुचाकी, पाच ते सहा चारचाकी वाहनांचा समावेश होता. विशेषतः पन्नासहून अधिक महिला फेटे बांधून वाहन रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.