आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत झुलेलाल जयंती:“जय झुलेलाल’चा जयघोष करत निघाली वाहन रॅली; संत झुलेलाल जयंती उत्साहात साजरी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत झुलेलाल सेवा समितीतर्फे शनिवारी (२ एप्रिल) सिंधी कॉलनी येथून वाहन रॅली काढण्यात आली. पांढऱ्या पोशाखात समाजबांधव यात सहभागी झाले होते. शिस्तीने निघालेल्या रॅलीने अनेकांचे लक्ष वेधले. “जय झुलेलाल’ असा जयघोष या वेळी करण्यात आला.

संत झुलेलाल जयंतीनिमित्त सकाळी सिंधी कॉलनी येथे पंचामृत स्नान होऊन दुपारी १२ वाजता वाहन रॅली काढण्यात आली. माजी आ. किशनचंद तनवाणी, चिरंजीवलाल बजाज यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. सिंधी कॉलनी, आकाशवाणी चौक, मोंढा नाका, अमरप्रीत, क्रांती चौक, पैठण गेट, टिळक पथ, सिटी चौक, शहागंज, अभिनय थिएटरमार्गे सिंधी कॉलनी येथील सिंधी भवनात रॅलीचा समारोप झाला. तीनशे ते चारशे दुचाकी वाहनांचा यामध्ये सहभाग होता. महिलांनीही खास उपस्थिती दर्शवली.

शोभायात्राही आकर्षक ठरली : वाहन रॅलीनंतर शहागंज येथील वरुणदेव जलाश्रम येथे आरती करण्यात आली. या वेळी शोभायात्रा काढण्यात आली. राम मंदिराची प्रतिकृती, इंटरनेटचा दुरुपयोग यावरील देखावे आणि अखंड तेवत राहणारी ज्योत अशा प्रकारचे आकर्षक दृश्य लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेचा संस्थान गणपती, जाधवमंडीमार्गे सिंधू भवन कुंवरकुटी येथे समारोप करण्यात आला. या ठिकाणी ढोलपथक, रथ याचे आकर्षण होते. सिंधी कॉलनी येथील मैदानावर नृत्याचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या वेळी राजू परसवाणी, राजू तनवाणी, भरत नेहलानी, शंकर गुणवानी, आनंद दयालानी, कल्याणदास माटरा, आकाश आहुजा, राकेश काल्डा, विजय छबलानी, मेहुल बजाज, धनराज केवलानी, अजय तलरेजा, गुलशन करमानी, प्रदीप गुनवाणी, देशराज डेबरा, जगदीश बजाज आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...