आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफास्टटॅग प्रणाली लागू झाल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझावर प्रतीक्षा अवधीत मोठी घट झाल्याचे उत्तर परिवहन मंत्रालयाने संसदेत दिले. मंत्रालयाने सांगितले की, संचालन आणि काही अस्थायी तांत्रिक समस्यांमुळे पीक अवर्समध्ये काही लेनमध्ये रांगा लागू शकतात. टोल प्लाझाकडून काय सुविधा मिळतात आणि वेटिंग टाइम जास्त असल्यास काय होईल,हे जाणून घेऊया...
{प्लाझावर वेटिंगचा जास्तीत जास्त अवधी किती? नॅशनल हायवे अथॉरिटीकडून जारी निर्देशांनुसार, हायवे प्लाझावर गर्दीच्या वेळी कोणतेही वाहनाचा १० सेकंदापेक्षा जास्त वेटिंग टाइम नसेल. १०० मीटरपेक्षा जास्त रांग लागणार नाही,अशी वाहतूक व्यवस्था लागेल. { १० सेकंदांपेक्षा जास्त वेटिंग टाइम असल्यास? टोल प्लाझावर वाहनांची १०० मीटरपेक्षा जास्त लांब रांग असल्यास गाडीला टोलशिवाय जाऊ दिले जाईल. वाहनांची लांब रांग रोखण्यासाठी १०० मीटरवर यलो लाइन मार्क केला जाईल. यामुळे लांब रांग लागणार नाही. { टोल प्लाझावर काय सुविधा मिळतात? राष्ट्रीय महामार्गावर कोणीही आजारी पडल्यास मेडिकल इमर्जन्सी फोन नंबरवर कॉल करा. १० मिनिटां रुग्णवाहिका येते. आपत्कालीन स्थितीत ही सुविधा मोफत आहे. प्रथमोपचाराची गरज असल्यास त्वरित मिळेल. अन्य काही अडचण असल्यास हेल्पलाइन नंबर १०३३ वा १०८ वर फोन करून मदत घेऊ शकता. याशिवाय वाहन िबघडले किंवा इंधन संपल्यावर एनएचआयच्या टोलवर दिलेल्या नंबरला फोन करून तुम्हाला मदत मिळू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.