आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड कोरोना:विद्युत पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर बंद, कोरोना कक्षातील रुग्णांचा तडफडून मृत्यू

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आ. विनायक मेटेंनी आरोग्य मंत्री राजेश टोपेंकडे केली तक्रार

कोरोना कक्षातील विद्युत पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. विद्युत पुरवठा नसल्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडले आणि बीडमधील रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हेंटिलेटर बंद पडल्यामुळे रुग्ण तडफडत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बीडच्या शासकीय कोरोना कक्षातील ही विचलित करणारी दृश्य आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात मनमानी कारभाराने एका कोविड रुग्णाचा जीव घेतला. व्हेंटिलेटर अभावी त्या रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयात सरार्सपणे अनागोदी कारभार सुरु असून याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी आ विनायक मेटे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात आ मेटे यांनी (दि 29) जुलै रोजी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर बंद पडल्यामुळे मरण पावला,हे धक्कादायक आणि रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणाचा कळस असल्याचे म्हटले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात हे जिल्हा रुग्णालयाकडे अजिबात लक्ष देत नाहीत, ते त्यांच्या कार्यालयात बसत नाहीत, इतर डॉक्टर हि तसेच करतात, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी 4 महिन्यात कोरोना वॉर्डाला एकवेळ फक्त भेट दिली असल्याचा आरोप आ मेटे यांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये औषधोपचार मिळत नाही, रुग्णवाहिका नसते, वाचमन नसतात, अनेकवेळा लाईट जाते, जनरेटर खराब असते या अशा अनागोदीमुळंच जिल्हा रुग्णालयात दगावला आहे. म्हणून अनेक ठिकाणी मरण्यापेक्षा दुसरीकडे मारू असे म्हणून अनेक रुग्ण पुणे - मुंबई - औरंगाबादला जात आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नातेवाईकच येथे उपचार घेत नसून इतर ठिकाणी जातात. यावरूनच कळते कि उपचार व्यवस्था कशी आहे आपल्या जिल्ह्यात? असे आ मेटे यांनी म्हंटले आहे.

आरोग्य सुविधांकरिता करोडो रुपये आलेले आहेत, परंतु ज्याची गरज नाही अशी अनेक कामे काढून त्यांना भ्रष्टाचारर करण्यामध्ये स्वारस्य आहे, किमती अवाजवी लावायच्या, कुणालाही नीट उपचार करायचे नाहीत असा सर्व कारभार सुरु आहे. याबाबत मी आपणास भेटून पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली होती व आपणही कारवाई करण्यात येईल असे म्हंटले होते. मात्र आपणास यायचा विसर पडला असेल अन कारवाई काहीच झाली नाही. असे देखील आ मेटे यांनी पत्रात ना राजेश टोपे यांना म्हंटले आहे. राष्ट्रवादीचे आमदार यांचा दबाव बहुतेक आपल्यावर असावा कारण त्यांच्या कार्यकर्त्यांचेच अनेक कामे आणि टेंडर तिथे आहेत, परंतु टोपे साहेब यांना आपण संभाळण्यापेक्षा कोविडच्या रुग्णांना सांभाळा, आणि अशा गलथान व भ्रष्टाचारी लोकांवर त्वरित कारवाई करावी, संबंधितांना निलंबित करावे अशी मागणी आ विनायक मेटे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

प्रकरणाची चौकशी करा- आ. सुरेश धस

रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना विजेची अद्यावत सोय करुन ठेवणे गरजेचे होते. पण, असे न झाल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.