आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक शालेय क्रिकेट स्पर्धा:अल्फान्सो स्कूल, शारदा हिंदी विद्यालयाचा संघ विजयी, ओम पवारचे अर्धशतक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट अल्फान्सो इंग्लिश स्कूल अ संघ व शारदा हिंदी विद्यालयाच्या संघाने विजय मिळवला. अल्फान्सो संघाने वुडरीज हायस्कूलवर ६ गडी राखून मात केली. या लढतीत ओम पवार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अल्फान्साने 15 षटकांत 6 बाद 102 धावा उभारल्या. यात सलामीवीर मित पाटीलने 25 चेंडूंत 14 व पौरुष मिसाळने 274 चेंडूंत 17 धावा काढल्या. कर्णधार हर्ष काळेने 5 चेंडूंत 3 चौकार खेचत 12 धावा जोडल्या. हर्षित जोशीने 11 केल्या. पार्थ मुंदडाने 18 चेंडूंत 4 चौकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 27 धावांची खेळी केली. अल्फान्सोने गौरव सरोदेने 30 धावा देत 2 गडी टिपले. हर्ष अव्हाडने एकाला टिपले.

प्रत्युत्तरात, सेंट अल्फान्सो संघाने अखेरच्या चेंडूंत चौकार खेचत 4 गडी गमावत विजय साकारला. यात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ओम पवारने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 46चेंडूंचा सामना करताना 6 सणसणीत चौकार खेचत 54 धावा ठोकल्या. संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार दिव्यांश पाठक अवघ्या 6 धावांवर परतला. दुसरा सलामीवीर जीत पाल 11 धावांवर बाद झाला. प्रवण वनारसेने 11 धावांचे योगदान दिले. वुडरीजकडून पौरुष मिसाळ व युवराज खांबेकरने प्रत्येकी एकाला टिपले.

केतन दुसारे सामनावीर

दुसऱ्या लढतीत केतन दुसारेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शारदा हिंदी विद्यालयाच्या संघाने किड्स किंगडम स्कूलवर 95 धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम खेळताना शारदाने 15 षटकांत सर्वबाद 133 धावा उभारल्या. यात केतनने 40 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचत 77 धावा ठोकल्या. सुरज तुपकेने 10 धावा जोडल्या. प्रत्युत्तरात, किंगडमचा डाव 8 षटकांत 38 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याही एकाही फलंदाजाला दुहेरी आकाडा गाठता आला नाही. शारदाकडून केतन दुसारेने 3 आणि सौरव शिंदे व अविश्न खिल्लारेने प्रत्येकी एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...