आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक शालेय क्रिकेट स्पर्धा:केंम्ब्रिज स्कूलची सरस्वती भुवन प्रशालेवर मात, व्योम खर्चे ठरला सामनावीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केंम्ब्रिज स्कूलने विजय मिळवला. केंम्ब्रिजने सरस्वती भुवन प्रशालेच्या (एसबी) संघावर 41 धावांनी मात केली. एसबीच्या गोलंदाजांनी व फलंदाजांनी सुमार कामगिरी केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत व्योम खर्चे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून एसबीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केंम्ब्रिजने 15 षटकांत 8 बाद 124 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात सलामीवीर तथा कर्णधार जीत राजपूतने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने 27 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार खेचत सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. गणेश सरताळेने स्वत:च्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेत तंबूत पाठवले. दुसरा सलामीवीर हर्ष धुतने 5 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार लगावत 14 धावा केल्या. ए. जैस्वालने 11 धावा जोडल्या. व्योम खर्चे (6) व अर्थव तोतला (2) हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. याद्य्निक पुजारीने 6 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार खेचत 12 धावा काढल्या. ध्रुव ढेकाणे भोपळाही फोडू शकला नाही. अमेय गर्गे ७ धावांवर नाबाद राहिला. संघाला तब्बल 35 धावा अतिरिक्त मिळाल्या आहेत. एसबीकडून समर्थ देशमुखने 23 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. युवराज पटेल, श्रेयस जोशी व गणेश सरताळेने प्रत्येकी एकाला टिपले.

व्योम, अवुधतची भेदक गोलंदाजी :

प्रत्युत्तरात, सरस्वती भुवनचा संघ निर्धारित षटकांत 9 बाद अवघ्या 83 धावा करु शकला. केंम्ब्रिजच्या भेदक गोलंदाजी पुढे एसबीचे फलंदाज टिकू शकले नाहीत. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कृष्णा पाटील अवघ्या 4 धावांवर परतला. स्वराज कुलकर्णीने 10 आणि कर्णधार श्रेयस जोशीने 12 धावा केल्या. त्यानंतर युवराज पटेल व ऋषिकेश पाटील शुन्यावर बाद झाले. गणेश सरताळेने 15 चेंडूंत 2 चौकारांसह 18 आणि समर्थ देशमुखने 28 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 19 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. केंम्ब्रिजच्या व्योम खर्चेने 22 धावा देत 3 गडी बाद केले. अवधुत पालोदकरने 10 धावांत 2 बळी घेतले. अर्थव तोतला, ध्रुव ढेकणे व ए. जैस्वालने प्रत्येकी एक गडी टिपला.

बातम्या आणखी आहेत...