आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक शालेय क्रिकेट स्पर्धा:एमजीए स्कूल, एसबीओए संघ विजयी; श्लोक गिरगे ठरला सामनावीर

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एमजीएम स्कूल, एसबीओए संघाने विजय मिळवला. एमजीएमने श्रीराम विद्या मंदिर शाळेच्या संघावर रोमांचक लढतीत ८ धावांनी मात केली. यात श्लोक गिरगे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एमजीएमने १५ षटकांत ७ बाद ९१ धावांचे माफक आव्हान उभारले. यात सलामीवीर तथा कर्णधार श्लोक गिरगेने ४३ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. शुभमने त्याला ओम खांडेकरच्या हाती झेल बाद करत अडथळा दुर केला. दुसरा सलामीवीर अनिकेत वाहटुळे ३ धावांवर परतला. यष्टिरक्षक फलंदाज रणवीर शेलारने २० चेंडूंत १ चौकार खेचत १३ धावा जोडल्या. अफैज बागवानच्या १२ धावा वगळता इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. सार्थक जी. (३), अर्थव थोरात (१) हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. क्षीतिज जोंगडे भोपळाही फोडू शकला नाही. श्रीराम शाळेच्या ओम खंडेकर आणि केदारने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. ध्रुव पुंडने एकाला टिपले.

प्रत्युत्तरात, श्रीराम शाळेचा संघ निर्धारित षटकांत ७ बाद ८३ धावा करु शकला. यात सलामीवीर महादेव पटेवाड एका धावेवर बाद झाला. बिचरेने १७ चेंडूंत ३ चौकारांसह १८ धावा केल्या. रजनीशने २० चेंडूंत २० धावा काढल्या. आदित्यने ११ व केदारने नाबाद १६ धावांचे योगदान दिले. कर्णधार आर्यन चौधरी शुन्यावर बाद झाला. एमजीएमकडून क्षीतिज जोंगडेने ३, श्लोक गिरगेने २ आणि तुषार दाभाडेने एक गडी बाद केला.

श्रीवास्तव अर्धशतकी खेळी, एसबीओए १४० धावांनी विजयी

दुसऱ्या लढतीत, एसबीओए पब्लिक स्कूलने लिटिल फ्लॉवर स्कूलवर १४० धावांनी मोठा विजय मिळवला. एसबीओएने १५ षटकांत ३ बाद १५५ धावा उभारल्या. यात श्रीवास्तव कुलकर्णीने ४९ चेंडूंत ७९ धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात, लिटिल फ्लॉवर संघाचा डाव अवघ्या १५ धावांवर संपुष्टात आला. त्यांचे सात फलंदाज शुन्यावर तंबूत परतले. सामनावीर ठरलेला श्रीवास्तव कुलकर्णीने ८ धावा देत ५ गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...