आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक टी-20 चषक स्पर्धा:ग्रामीण पोलिस, कॉस्मो संघाचा विजय; पीडब्ल्यूडी व एनएचके संघाचा पराभव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक टी-२० चषक स्पर्धेत ग्रामीण पोलिस व कॉस्मो फिल्म्स संघाने विजय मिळवला. रविवारी झालेल्या सामन्यात ग्रामीण पोलिसांनी पीडब्ल्यूडी संघावर ८३ धावांनी मात केली. या लढतीत अभिजीत भगत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना ग्रामीण पोलिसांनी २० षटकांत ६ बाद १८१ धावांचा डोंगर उभारला. यात सलामीवीर विकास नगरकर व अभिजित भगतने शानदार अर्धशतके झळकावली. अष्टपैलू विकासने ५० चेंडूंत ६ चौकार खेचत ५८ धावांची खेळी केली. दुसरा सलामीवीर विशाल नरवडे १३ धावांवर परतला. अभिजित भगतने अवघ्या २८ चेंडूंत तडाखेबंद खेळी करत ५ चौकार व ४ उत्तुंग षटकार मारत ५९ धावा ठोकल्या. धीरज बहुरे ७, ओमसिंग ठाकूर १५ व संदीप जाधव ५ धावांवर परतले. पीडब्ल्यूडीकडून शैलेश सूर्यवंशीने २ आणि नीरज देशपांडे, सुहास चाबुस्कवार, अमित पाठक यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

प्रत्युत्तरात, पीडब्ल्यूडी संघाचा डाव १८.५ षटकांत ९८ धावांवर संपुष्टात आला. यात सलामीवीर अमित पाठकने सर्वाधिक १६ धावांची खेळी केली. दुसरा सलामीवीर सागर जावळेने १५ आणि अजिंक्य दाभाडेने १० धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ग्रामीण पोलिसांकडून संजय सपकाळ आणि कल्याण बहुरेने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. योगेश पवार व विकास नगरकरने एकाला टिपले.

अष्टपैलू सतीश भुजंगे ठरला सामनीवीर

दुसऱ्या लढतीत सतीश भुजंगेच्या (४९ धावा, २ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कॉस्मो संघाने एनएचकेवर ७ गडी राखून मात केली. प्रथम खेळताना एनएचकेने २० षटकांत सर्वबाद ११५ धावा उभारल्या. यात नैफ अमोदीने सर्वाधिक २५ धावा केल्या. कॉस्मोच्या सतिश भुजंगे, रोहन हंडीबाग, भास्कर जीवरग यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. महेंद्र धागेने ३ गडी टिपले. प्रत्युत्तरात, काॅस्मो संघाने १३.४ षटकांत ३ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर सतीश भुजंगेने २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार लगावत ४९ धावा काढल्या. शाश्वत बिस्टने नाबाद २९ आणि विराज चितळेने नाबाद १२ धावांची विजयी खेळी केली. एनएचकेच्या अनिल भवर व पंकज फलकेने प्रत्येकी एक गडी बाद केला.

बातम्या आणखी आहेत...