आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघाटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टी-20 चषक स्पर्धेत एमआर इलेव्हन आणि एनआरबी संघाने विजय मिळवला. पहिल्या लढतीत एमआर संघाने शहर पोलिस संघावर 8 गड्यांनी मात केली. या सामन्यात सय्यद फिरदोस सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शहर पोलिसांनी 19.2 षटकांत सर्वबाद 104 धावा काढल्या. यात आघाडीचे पाच फलंदाज सपशेल अपयशी ठरले. सलामीवीर प्रदीप जगदाळे 4, गिरिजानंद भक्त 8, सुदर्शन एंखडे 10 व अजय काळे 15 धावांवर परतले. रिजवान अहमद भोपळाही फोडू शकला नाही. शेख जिलानीने 29 चेंडूंत चौकारांसह नाबाद 25 धावा केल्या. राहुल राजपूतने 11 धावा जोडल्या. एमआरकडून सय्यद फिरदोसने 24 धावा देत 4 गडी बाद केले. शिवराज शेळके, मो. वसिम व विनोद यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात एमआर संघाने 11.5 षटकांत 2 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर शेख वसिमने 21 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 31 धावा केल्या. दुसरा सलामीवीर इम्रान पटेलने 24 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 33 धावा काढल्या. अदनान अहमदने नाबाद 10 आणि मो. वसिमने 14 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 24 धावांची विजयी खेळी केली. शहर पोलिसांकडून अष्टपैलू प्रदीप जगदाळेने 26 धावा देत दोन गडी बाद केले.
मतसागरची भेदक गोलंदाजी, 5 बळी घेतले :
दुसऱ्या लढती, एनआरबी संघाने गुड इअर संघावर 7 गडी राखून मात केली. प्रथम खेळताना गुडइअरने 20 षटकांत 8 बाद 175 धावा काढल्या. सलमान अहमदने 70 व राहुल पाटीलने 41 धावा केल्या. एनआरबीच्या रामेश्वर मतसागरने 13 धावा देत 5 गडी बाद केले. संदीप राठोड व अंकित जाधवने प्रत्येकी एकाला टिपले. प्रत्युत्तरात एनआरबीने 18.3 षटकांत 173 धावा करत विजय मिळवला. यात सचिन शेडगेने 49, शुभम हरकळने 56, अष्टपैलू अंकित जाधवने नाबाद 49 धावांचे योगदान दिले. गुडइअरच्या सलमान अहमद व राहुल पाटीलने प्रत्येकी एकाला टिपले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.