आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या आंतरशालेय व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेत नाथ व्हॅली स्कूल, सारडा हिंदी विद्यालम संघांनी विजय मिळवला. नाथ व्हॅलीने अ.कृ.वाघमारे शाळेच्या संघावर ५७ धावांनी मात केली. यात रबमित सिंग सोढी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेके जिंकून प्रथम फलंदाजी करताना नाथ व्हॅलीने १५ षटकांत ४ बाद १४७ धावा उभारल्या. यात सलामीवीर कर्णधार जैविक सरोदेने २० चेंडूंत ४ चौकारांसह २२ धावा केल्या. दुसरा सलामीवीर विश्वराज सागरने १७ चेंडूंत ४ चौकार मारत २४ धावा जोडल्या. जैविक व विश्वराज जोडीने संघाला ५७ धावांची सलामी दिली. रबमित सिंग सोढीने ३४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचत सर्वाधिक ३७ धावा काढल्या. सर्वेश सिंगटमकरने १६ धावा केल्या. वाघमारेकडून ओंकार पांचाळने २ आणि मोहित लहेकरने १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात, अ.कृ. वाघमारे शाळेचा संघ निर्धारित षटकांत ९ बाद केवळ ९० धावा करु शकला. संघाची सुरुवात खराब झाली. सलामवीर केतन लोखंडे भोपळाही फोडू शकला नाही. दुसरा सलामीवीर गौरव देशमुख २ धावांवर परतला. अनिकेत शिंदेने ४५ चेंडूंत ६ चौकारांसह सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. उदय धनेधरच्या ११ धावा वगळता इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. नाथ व्हॅलीकडून जैविक सरोदे, अर्णव मुंदडा व रबमित सिंगने प्रत्येकी दोन-दाेन गडी बाद केले.
कार्तिकेश डोळस सामनावीर
दुसऱ्या सामन्यात सारडा हिंदी विद्यालयाच्या संघाने द वर्ल्ड स्कूलवर ५ गडी राखून मात केली. प्रथम खेळताना द वर्ल्डने १५ षटकांत ४ बाद १०४ धावा काढल्या. यात अथर्व गोस्वामीने शानदार ५४ धावा केल्या. कार्तिक पाठकने २५ धावा काढल्या. सारडाकडून केतन दुसारेने २ व सौरव शिंदेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात, सारडा संघाने १३.२ षटकांत ५ गडी गमावत विजय साकारला. यात कर्णधार अजय राजपूतने १७, कार्तिकेश डोळसने सर्वाधिक ३३, सौरव शिंदेने नाबाद १० धावांचे योगदान दिले. द वर्ल्डकडून प्रणव जे. याने २, कार्तिक पाठक व अर्थव गोस्वामीने १-१ गडी बाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.