आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक शालेय चषक:राजे शिवाजी शाळा, भोंडवे पाटील स्कूल संघ विजय; ऑर्चिड, फ्रान्सलिन संघाचा पराभव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत वाळुज येथील राजे शिवाजी शाळा व भोंडवे पाटील स्कूल संघाने विजय मिळवला. पहिल्या लढतीत राजे शिवाजी शाळेने ऑर्चिड स्कूल अ संघावर 35 धावांनी मात केली. या लढतीत हितेश भडाने सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना राजे शिवाजी शाळेने 15 षटकांत 7 बाद 109 धावा उभारल्या. यात संघाला सर्वाधिक अतिरिक्त धावा मिळाल्याने विजयाची संधी लाभली. त्यांना तब्बल 41 अतिरिक्त धावा मिळाल्या. सलामीवीर कर्णधार रोहन मधे 10 व दुसरा सलामीवीर विजय मगर 8 धावांवर परतले. प्रणव वनसेने 18 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 18 धावा केल्या. अजय मगरने 27 चेंडूंत 14 आणि अकाश शिंदेने 10 धावा केल्या. इतर फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ऑर्चिडकडून प्रतिक डांगेने 29 धावा देत 2 आणि प्रणतिक सिंगने 12 धावा देत 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात ऑर्चिड टेक्नो संघाचा डाव 13.2 षटकांत 74 धावांवर संपुष्टात आला. संघाचे दोन्ही सलामीवीर भोपळाही फोडू शकले नाहीत. त्यांचे एकूण पाच फलंदाज शुन्यावर बाद झाले. अहाद खानने 23 चेंडूंत 2 चौकार खेचत सर्वाधिक 19 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. राजे शिवाजी शाळेकडून हितेश भडानेने 3 षटकांत 17 धावा देत 4 फलंदाजांना तंबूतचा रस्ता दाखवला. त्याने एक षटक निर्धाव टाकले. वैभव जाधवने 3 आणि प्रणव वनसेने 2 गडी बाद केले.

समर्थ जोशी ठरला समानावीर

दुसऱ्या लढतीत भोंडवे पाटील पब्लिक स्कूलने फ्रान्सलिन स्कूलवर 22 धावांनी विजय मिळवला. भोंडवे संघाने 15 षटकांत 6 बाद 87 धावा काढल्या. प्रत्युत्तरात फ्रन्सलिन संघ निर्धारित षटकांत 9 बाद अवघ्या 65 धावा करु शकला. भोंडवे संघाकडून कर्णधार समर्थ जाेशीने 3 षटकांत 8 धावा देत 3 गडी बाद केले. रोहन जिवरगने 2 बळी घेतले. समर्थ जोशीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...