आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये व्हेरॉक चषक:बडवे, एमआर इलेव्हन संघ विजयी; सय्यद जावेद व मो. वसीम ठरले सामनावीर

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडीसीए मैदानावर सुरू असलेल्या 16 व्या व्हेरॉक औद्योगिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बडवे आणि एमआर इलेव्हन संघांनी विजय मिळवला. रविवारी झालेल्या सामन्यात बडवे संघाने आयजीटीआर संघावर 5 गडी राखून मात केली. दुसऱ्या लढतीत एमआर इलेव्हन संघाने आयआयए संघावर 6 गड्यांनी विजय मिळवला. या सामन्यात सय्यद जावेद व मो. वसीम सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रथम फलंदाजी करताना आयजीटीआरने 15.5 षटकांत सर्वबाद 90 धावा काढल्या. यात सलामीवीर इंद्रजीत उढाणने 34 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचत सर्वाधिक 38 धावा केल्या. आकाश बोराडेने 15 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 24 धावा जोडल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बडवेकडून सय्यद जावेदने 20 धावा देत 4 गडी बाद केले. अनिकेत काळेने 3 बळी घेतले. प्रत्युत्तरात बडवे संघाने 13.5 षटकांत 5 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अकाश विश्वकर्मा 6 व ज्योतीबा विभुते 6 धावांवर परतले. दुसरा सलामीवीर सय्यद जावेदने 16 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचत 28 धावा काढल्या. अष्टपैलू अनिकेत काळेने 15, जावेद चांदने 18 धावांचे योगदान दिले. आयजीटीआरकडून सुशील नाईकने 2 बळी घेतले. यश एम., आकाश बोराडे व दीपक जगतापने प्रत्येकी एकाला टिपले.

वसीम, विनाेदची भेदक गोलंदाजी

दुसऱ्या लढतीत, प्रथम खेळताना आयआयएने 19.1 षटकांत सर्वबाद 100 धावा काढल्या. यात दशविरसिंग छाबडाने 53 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचत 47 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. एमआरकडून मो. वसीमने 21 धावा देत 4 गडी बाद केले. विनोद यादवने 9 धावांत 4 फलंदाज तंबूत पाठवले. प्रत्युत्तरात एमआरने 11.2 षटकांत 4 गडी गमावत विजय साकारला. यात शेख वसीमने 14, अब्दुल कय्युमने सर्वाधिक 34 आणि मो. वसीमने नाबाद 22 धावांची खेळी केली. आयआयएकडून सुनील भालेने 2 विकेट घेतल्या.

बातम्या आणखी आहेत...