आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेरॉक टी-20 चषक:महावितरण, श्रृती संघाचा विजय, स्वप्निल चव्हाण ठरला सामनावीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टी- 20 क्रिकेट स्पर्धेत महावितरण व श्रृती संघाने विजय मिळवला. पहिल्या सामन्यात महावितरण संघाने जीएसटी संघावर 8 गडी राखून मात केली. या लढतीत स्वप्निल चव्हाण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून महावितरणने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना जीएसटी इलेव्हनने 20 षटकांत 6 बाद 108 धावा उभारल्या. यात संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर संतोष सूर्यवंशी 3 आणि राजू राजपूत अवघ्या 2 धावांवर परतले. तिसऱ्या क्रमांकवर आलेल्या हर्ष कीर्तिकरने अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचत सर्वाधिक 54 धावा काढल्या.

संदीप गाडेने 18 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार लगावत 21 धावा जोडल्या. जी. श्रीकांत 8 व अनिल थोरे 3 धावा करुन परतले. राहुल अमले 10 धावांवर नाबाद राहिला. महावितरणच्या राम राठोड, राहुल शर्माने 1-1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरात, महावितरण संघाने 13.4 षटकांत 2 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर प्रदीप चव्हाणने 10 धावा केल्या. सचिन पाटील भोपळाही फोडू शकला नाही. अष्टपैलू स्वप्निल चव्हाणने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने 44 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 उत्तुंग षटकार खेचत नाबाद 69 धावांची विजयी खेळी केली. राहुल शर्मा 17 धावांवर नाबाद राहिला. जीएसटीकडून जी. श्रीकांतने बळी घेतला.

ऋषिकेश नायर ठरला सामनावीर

दुसऱ्या लढतीत श्रृती संघाने आयजीटीआर संघावर 39 धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना श्रृती संघाने 20 षटकांत 9 बाद 130 धावा काढल्या. यात योगेश चौधरीने 13, अभिषेक दाबकेने सर्वाधिक 23, नितीन चव्हाणने 10, ऋषिकेश नायरने 15 व रमेश साळुंकेने 16 धावा केल्या. सुशील नायर, यश महाजन व अर्थव जगतापने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात आयजीटीआर संघ 18.4 षटकांत सर्वबाद 91 धावा करु शकला. श्रृतीकडून ऋषिकेश नायरने 11 धावा देत 5 गडी बाद केले. रमेश साळुंकेने 2 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...